मुळा सहकारी बँक नवनियुक्त चेअरमन श्री माणिकराव होंडे यांची बिनविरोध निवड.

मुळा सहकारी बँक नवनियुक्त चेअरमन श्री माणिकराव होंडे यांची बिनविरोध निवड.
नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असलेली नवउद्योजकांना वित्त पुरवठा करून स्वतःचे व्यवसाय उभे करण्यासाठी उत्तेजन देणारे बँक म्हणून अल्पवधीत नावलौकिक मिळवलेली मुळा बँकेचे नवनियुक्त चेअरमन म्हणून माणिकराव होंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेली पंचवीस वर्षे सेवेत असलेल्या बँकेचे चेअरमन म्हणून नेवासा तालुक्यातील पाचुंदा गावचे सर्वसामान्य कार्यकर्ते तसेच पाचुंदा सोसायटीचे विद्यमान चेअरमन यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जल्लोष पाहावयास मिळत आहे.
माजी खासदार यशवंत गडाख यांनी या बँकेचा पाया उभा करून माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी पुढे यशस्वी वाट चालू केलेली असून यामध्ये खारीचा वाटा माजी सभापती सुनिता ताई गडाख यांचा आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तूवर तसेच असंख्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने श्री होंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यासाठी शंकरराव दरंदले काळे साहेब भोर साहेब बँकेचे मॅनेजर सिकची साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री माणिकराव होंडे यांची मुळा सहकारी बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्यानिमित्त पाचुंदा ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व सत्कार समारंभ कार्यक्रम हनुमान मंदिर समोर करण्यात आला यावेळी स्वरूपचंद गायकवाड सर खंडेश्वर वाघमोडे भरत होंडे नारायण वाघमोडे यांची भाषणे झाली बाबासाहेब होंडे यांनी सूत्रसंचालन केले व शहाजी होंडे यांनी आभार मानले.