आदर्श जीवनाची अलिखित आचार संहिता म्हणजे श्री प्रभु श्रीराम यांचे जीवनचरित्र*

*आदर्श जीवनाची अलिखित आचार संहिता म्हणजे श्री प्रभु श्रीराम यांचे जीवनचरित्र*
निती न्याय धर्म, सदाचार, आणि संस्कार हाच यशस्वी जीवनाचा उत्तम मार्ग आहे. मानवी जीवन हे संस्कारांची खाणं आहे हि शिकवण जगासाठी अलिखित आचारसंहिता म्हणून पथ मार्ग निर्माण करणारे जगद वंदय सृष्टी चे पालक भगवान प्रभु श्रीराम यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी निगडित प्रत्येक प्रसंग हा मानवतेचा न्यायचा, नितीच संस्कारांचा धर्माचा, शौर्याचे दर्शन घडवणारा आहे.अगदी बाल वयात राजपुत्र असताना देखील वनात गुरू विश्वामित्र ऋषी यांच्या आश्रमात जाऊन झोपडीत राहुन गावतावर झोपुन फळ कंदमुळे सेवण करून शिक्षण घेतलं.हा किती मोठेपणा आपल्याकडं थोडी संपत्ती असली तर आपण कसं वागतो आणि जगाचा राजा सगळ्यात मोठं राज्य असणार्या अयोध्यचे राजपुत्र राम यांचं अनुकरणीय अचरण वंदनीय आहे. उद्या अयोध्येचे राजे म्हणुन राज्य अभिषेक होणार तरी आनंद नाही आणि संध्याकाळी समजलं राज्य अभिषेक रद्द चौदा वर्षे वनवास आहे तरी दुःख नाही .बंधु लक्ष्मण वडीलांवर चिडला तर त्याला धर्म समाजावला आणि शांत केले व तातडीने विलंब न करता वनवासात निघाले . वनवासाला जाताना शरयु नदी पार करत असताना नावेतुन पैलतीर जात असताना त्या नाविकाला दिलेली मुदरीक असो कि चिञकुट पर्वातावर पोहचल्यावर जेव्हा वनदेवी ने स्वागत केले आणि विचारले हे प्रभु मी आपली काय सेवा करू तेव्हा प्रभु श्रीराम यांनी अद्भुत उतर दिलं ते म्हणजे मी ज्या रस्त्याने आलो आहे त्या रस्त्यावर असणारे काटे काढून टाकावे हे ऐकुन वनदेवी अचंभित झाली आणि वनदेवतेने पुन्हा प्रश्न केला प्रभु आपणं तर आलात मग काटे कशासाठी हटवु तेव्हा प्रभु श्रीराम म्हटले मला शोधत माझा लहान बंधू भरत येईल त्याच्या पायात काटे मोडता कामा नये.हे ऐकुन वनदेवी स्तब्ध झाली .राजे दथरथ यांच्या निधनानंतर भेटीसाठी आलेली सर्व प्रजा बंधु भरत आणि सर्व माता आल्या असता सर्व प्रथम माता कयकयिचे दर्शन घेतलं म्हणजे माता कायकयिला वाईट वाटुनये भरत आणि संपूर्ण अयोध्या वाशी यांनी राजे दथरथ ह्यात नसल्याने आता वनवास त्यातुन परत चालावा हि विनंती केल्यावर सगळ्यांना निती धर्म शिकवला आणि सर्वांना अयोध्येला परत जाण्यासाठी आदरपूर्वक सांगितले.तदनंतर शबरीची उष्टी बोरे खाण असो कि पक्षीराज जटायू चा विधीवत अंत्य विधी केला. रावणाच्या विरूद्ध लढाई साठी प्रभु श्रीराम हे अयोध्येच सैन्य अथवा आजुबाजुला असणारा मामाच राज्य कौशल प्रदेश तसेच राजा जनक यांच्या पैकी कोणाचही सैन्य सोबत घेऊ शकले असते अथवा किंसकिदा राज्याचा राजा वाली ज्याने रावण बगलेत धरून आणला होता त्याची मदत घेऊन रावणाला परास्त केले असते पण असं न करता सुग्रीव जो वंचित होता त्याचा राज्यभिषेक करुन वनर राज वालिचा वध केला .वालिने शरण येऊन वधाचे कारण विचारले असता त्याला राजा बळीची कन्या,इंदपुञी बहीन विद्युत ज्वला , आणि पुत्र वधु सांधनी बदल कसा दृष्टीकोना बदल त्याची पाप आठवण करून दिली तेव्हा वालीने चुक मान्य करुन आपला पुत्र सुग्रीव याला प्रभु श्रीराम यांच्या स्वाधिन केले.महाबली हनुमान यांच्या मध्ये असणारी शक्ति व बुद्धी याचा योग्य उपयोग करत समुद्रावर सेतू निर्माण करत .राजा म्हणून रावणाला शरण येण्याची योग्य संधी दिली . शिष्टाई करण्यासाठी आंगद यास पाठविले .रावण शरण येत नसल्याने मग धर्म शास्त्रानुसार त्याच्या सोबत युद्ध करत अद्भुत आणि अलौकिक प्रसंगा नंतर लंकेवर विजय मिळावला दरम्यान बंधु लक्ष्मण यांना शक्ति लागली तो प्रसंग खुप कठिण आणि वेदनादायक होता .वनर सैन्य घेऊन लंकेवर विजय मिळवला आणि लंकेच राज्य बिभिषण यास देवुन चौदा वर्षे वनवास पुर्ण करुन पुन्हा अयोध्येला परत आले. या सगळ्या घटना घडामोडी दरम्यान प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम यांच उदारत्व शांत संयमी, आणि न्याय धर्म संस्कारी स्वभाव आणि अनुकरण हे युगो युगो येणार्या पिढ्यांसाठी एक आदर्श पथ मार्ग आहे. महाराज मनु व दैवी सतरूपा या उभयतांनी नैमिष अरण्यात तपश्चर्या केली महाराज मनु व देवी सतरूपा यांचे घनघोर तप पाहुण निराकार निर्गुण ब्रह्म प्रसन्न होऊन समिप आले.महाराज मनु व देवी सतरूपा यांच्या इच्छेनुसार निर्गुण ब्रह्म सगुण रूपात पुत्र रूपाने येण्याचे अभिवाचन दिले तदनुसार महाराज मनु यांनी दथरथ अवतार धारण केला देवी सतरूपा यांनी कौशल्य अवतार धारण केला आणि नैमिष अरण्यात दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी भगवान प्रभु श्रीराम यांनी अवतार धारण केला. आणि आजच्या दिवशी प्रभु श्रीराम यांचा अयोध्या नगरी येथे जन्म झाला त्याला आपण राम नवमी असं संबोधतो .