आळंदी देवाची येथे महामानवाला अभिवादन*

*आळंदी देवाची येथे महामानवाला अभिवादन*
प्रतिनिधि आरिफ भाई शेख
आज दि ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आळंदी देवाची येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आळंदी देवाची येथे भारतीय बौद्धमहासभा आळंदी शहर शाखेच्या वतीने सामूहिक त्रिसरण ,पंचशील, बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी डॉ निलेश रंधवे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित अस्पृश्यता निवारण व सामाजिक विषमता दूर करण्याच्या कार्याची माहिती दिली , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री असताना कामगार साठी कामाचे १२ तास वरून ८ तास केलेले कार्य, महिलांसाठी पगारी प्रस्तुती रजा मंजूर केलेले कार्य, अनेक भारतीय जाती, भाषा,पंथ यांना जोडून ठेवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या भारतीय राज्यघटना लिहिण्याचे मोलाचे कार्य याबद्द्ल माहिती दिली. आयु विलास रणपिसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धम्मचक्र प्रवर्तन याबद्द्ल माहिती दिली रिपब्लिकन सेनेचे खेड तालुका अध्यक्ष आयु संदीप रंधवे यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी जातीविषमते विरुद्ध उभारलेल्या चळवळी व आंदोलन याविषयी माहिती दिली. यावेळी विश्वनाथ थोरात, बौद्धचार्य आयु राजेंद्र रंधवे, आयु अक्षय रंधवे,आयु प्रभानंद शेलार, आयु विलास खळसोंडे उपस्थित होते
भारतीय बौद्धमहासभा आळंदी अध्यक्ष आयु ज्ञानेश्वर बनसोडे यांनी अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप केला