अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या भूमीगत गटारीच्या कामाचा शुभारंभ

अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या भूमीगत गटारीच्या कामाचा शुभारंभ
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रभाग क्रं.२ मधील अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या भूमीगत गटारीच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला असून उपसरपंच खंडागळे यांनी गटारीचे काम करण्याचे दिलेले आश्वासन पुर्ण होणार असल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून या गटारीचा प्रश्न प्रलंबीत होता. या परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळेस ग्रामपंचायतीला अर्ज देवून या गटारीचे काम करण्यास सुचविले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी टाकळीभान येथील भाजपा तालुका उपाध्यक्ष नारायण काळे यांनी गेल्या दहा बारा दिवसापूर्वी चक्क गटारीत बसूनच आंदोलन केले. यावेळी परिसरातील अधुर्या गटारीमुळे या ठिकाणी पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली. या वेळी या आंदोलनाची दखल घेत तातडीने उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून आठ दिवसात या गटारीचा प्रश्न मार्गी लावू असे सांगीतले.
या दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी मंगळवार दि.२६ जुलै रोजी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी या गटारीच्या कामाचा अखेर शुभारंभ केला. या कामासाठी सुरूवातील येथील बापूसाहेब शिंदे यांचा विरोध होता. मात्र खंडागळे यांच्या मध्यस्थितीने तसेच ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न विचारात घेता शिंदे यांचा विरोध मावळला. व चांगल्या कामाला साथ असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, राजेंद्र कोकणे, भारत भवार, बापूराव त्रिभूवन, भाऊसाहेब मगर, मधूकर कोकणे, नारायण काळे, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, भाऊसाहेब पटारे, प्रा.जयकर मगर, अशोक कचे, सुनिल त्रिभूवन, महेंद्र संत, मोहन रणनवरे, सुंदर रणनवरे, विलास सपकळ, आप्पा रणनवरे, बंडू बोडखे, बापूसाहेब शिंदे, गणेश गायकवाड, शरद रणनवरे आदीसह प्रभाग क्र.२ मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.