70 वर्षे वयाच्या आरोग्य महिलेला दोन भामट्यांनी वीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी कशी लुटली पहा.

70 वर्षे वयाच्या आरोग्य महिलेला दोन भामट्यांनी वीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी कशी लुटली पहा.
येथील ७० वर्षे वयाच्या एका वृध्द महीलेला पुजा करण्याचा बहाणा करुन दुचाकिवरुन आलेल्या दोन ठगांनी दिवसा ढवळ्या सुमारे २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लुटुन पोबारा केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान घडली आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि, येथील मेन पेठेतील रहात आसलेल्या वयोवृध्द महीला सिताबाई रामसुख गलांडे या विरंगुळा सायंकाळी ४ वाजता म्हणुन त्यांच्या घरासमोल टाकळकर यांच्या वाड्याच्या ओट्यावर बसल्या होते. त्यावेळी दुचाकिवरुन हेल्मेट घातलेले दोन तरुण त्यांच्याजवळ येवुन थांबले व विठ्ठल मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ते आंम्हाला दाखवता का ? आंम्हाला आईच्या शांतीसाठी पुजा करावयाची आहे असे सांगु लागले. विठ्ठल भक्त आसलेल्या सिताबाई जवळच आसलेले विठ्ठल मंदिर दाखवण्यासाठी गेल्या. माञ त्या ठगांनी पुन्हा सांगितले कि प्रथम मारुती मंदिरात पुजा करुन यावे लागेल. मारुती मंदीर थोडे दुर आसल्याचे सिताबाईंनी सांगताच ते आम्हाला दाखवा आमच्या दुचाकिवरुन आपन जावु असे ठगांनी सांगितल्यामुळे सिताबाई त्यांना घेवुन मारुती मंदिरात गेल्या. तेथे या ठगांनी आमच्या आईची शांती पुजा आसल्याने तुंम्ही पुजेसाठी बसा असा आग्रह धरला, त्यावर थातुर मातुर पुजा मांडुन ठागांनी पुजेला सुरवात केली. पुजा सुरु आसताना एक ठग म्हणाला कि तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत त्या पुजेच्या कापडावर ठेवा. तशी सिताबाईंनी गळ्यातील पोत काढुन त्या पुजेच्या कापडावरा ठेवली. ईच्छीत साध्य झाल्याने एक ठग नारळ आणन्याच्या बहाण्याने मारुती मंदिराच्या बाहेर गेला. पाच मिनिटाच्या आवधीने नारळ आणायला गेलेला अद्याप का आला नाही हे पहाण्यासाठी मंदिराबाहेर गेला तो आलाच नाही. सिताबाई माञ त्या पुजेच्या कापडाला राखण बसुन राहील्या काही वेळाने त्यांनी समोरच्या महीलेला बोलावले व झालेल्या घटनेची माहीती दिली. त्या महीलेनेपुजेला ठेवलेले कापड तपासले तर त्या कापडात सोन्याच्या पोती ऐवजी खडे दिसुन आले. आणि हे सर्व पाहुन वृध्द सिताबाईंनी दिवसा ढवळ्या लुटले टाहो फोडला.
या घटनेची माहीती टाकळीभान मध्ये पसरताच आनेकांनी वृध्द महीला लुटली गेल्याने हळहळ व्यक्त केली. माञ या घडलेल्या घटनेतुन इतर वृध्दांनी बोध घेऊन आनोळखी ईसमावर विश्वास ठेवु नये व कोणतीही माहीती त्यांना देवु नये. शक्यतो वृध्द महीलांनी मौल्यवान वस्तु जवळ बाळगु नयेत असा अनेकांनी सल्ला दिला आहे.