खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते आनदांचा शिधा किटचे वितरण

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते आनदांचा शिधा किटचे वितरण
अतिवृष्टीमुळे शेतकरी व कष्टकरी वर्गाचे झालेले नुकसान व सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्वांची दिवाळी गोड व्हावी या करीता आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला असुन या निर्णयामुळे गरीबांना दिपावलीचा आनंद घेता येणार असल्याचे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपुर तालुक्यात आनदांचा शिधा दुकानात पोहोच झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित वितरण होते की नाही हे पहाण्याकरीता खासदार लोखंडे यांनी रेव्हेन्यू सोसायटीच्या धान्य दुकानास भेट देवुन पहाणी केली वाटप व्यवस्थित सुरु असल्याचे पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे वितरणही करण्यात आले.
या वेळी त्याच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चित्ते राजेंद्र देवकर सुधीर वायखेडे संदीप वाघमारे कैलास भणगे नंदकिशोर आरोटे राजेंद्र त्रिभुवन उपस्थित होते रेव्हेन्यू सोसायटीच्या दुकानाचे सेल्समन रज्जाक पठाण यांनी आभार मानले