महाराष्ट्र

प्रसाद शुगर व्यवस्थापनाच्या वतीने बँक स्थाई तपासणी अधिकारी यांचा निरोप समारंभ संपन्न..!!

प्रसाद शुगर व्यवस्थापनाच्या वतीने बँक स्थाई तपासणी अधिकारी यांचा निरोप समारंभ संपन्न..!!

दि. ७-१-२०२२
प्रसाद शुगर अँण्ङ अँलाईड अँग्रो प्रोड्क्टस लिमिटेड वांबोरी येथे मागील चार-पाच वर्षापासून कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई. यांचे बँक स्थाई तपासणी अधिकारी श्री. संभाजी हिंम्मतराव पाटील यांना बँकेच्या नियमानुसार चार –पाच वर्षाचा कार्यकाळ झालेला असल्याने आणि पदोन्नती च्या कारणास्तव त्यांची बदली दिनांक १जानेवारी रोजीजुन्नर तालुका जिल्हा पुणे येथील विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे झाली.

 

बँक स्थाई तपासणी अधिकारी श्री. संभाजी हिंम्मतराव पाटील साहेब हे प्रसाद शुगर अँण्ङ अँलाईड अँग्रो प्रोड्क्टस लिमिटेड वांबोरी येथे मागील चार-पाच वर्षापासून कार्यरत होते ते मुळचे शेवगी बु !! तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील होते तर सध्या ते नाशिक येथे निवासी होते. त्यांचे आणि प्रसाद शुगर वांबोरी येथील सर्वच कर्मचारी यां सर्वांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण झालेले असल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ संपन्न होत असतांना पाटील साहेब आणि कर्मचारी यांना अश्रू अनावर झाले.

प्रसाद शुगर येथे कार्यरत असतांना नेहमीच बँकेचे हित जोपासत बँक प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेकदा मदत केली. पाटील साहेब यांनी प्रसाद शुगर च्या व्यवस्थापनाला जे काही सहकार्य केले ते आपण कधीही विसरू शकनार नाही. त्यांची उणीव आम्हांला नेहमीच भासत राहील. त्यांच्या या अचानक बदलीमुळे खरोखर एक पोकळी निर्माण झाली आहे. ते आम्हा सर्वांच्या नेहमीच आठवणीत राहतील.असे प्रसाद शुगर चे चिफ जनरल मँनेजर श्री.विकास आभाळे साहेब यांनी या वेळी बोलतांना सांगितले. त्यांनी व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ देऊन, भेटा बांधून सत्कार केला.
—————————————————————
” प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक मा. सुशीलकुमार देशमुख साहेब यांना काही अपरिहार्य कारणामुळे येता आले नसल्यामुळे त्यांनी भ्रणध्वनीद्वारे श्री.पाटिल साहेब यांना पुढील कर्यकाळासाठी आणि उत्तम आरोग्य लाभावे सूभेच्या दिल्या. “
—————————————————————–
बँक स्थाई तपासणी अधिकारी श्री.संभाजी हिंम्मतराव पाटील साहेब यांच्या जागी बँक प्रतिनिधी म्हणून श्री.शंकर दैलत बडाख यांची नियुक्ती झालेली असून ते अहमदनगर जिल्ह्यातील असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने प्रसाद शुगर येथील सर्व पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे.
_____________________________________________
” प्रसाद शुगर वांबोरी येथील चिफ जनरल मँनेजर श्री.विकास आभाळे साहेब आणि वर्क्स मँनेजर श्री.संजय म्हस्के साहेब, उत्पादन विभागाचे जनरल मँनेजर श्री. माने आणि लेबर ऑफिसर श्री. काळे साहेब, सुरक्षा अधिकारी प्रविण वाघमारे,स्टोअर किपर आबासाहेब कल्हापुरे, यांनी बँक प्रतिनिधी श्री. पाटील आणि बडाख साहेब यांचा यथायोग्य सत्कार करून पाटील साहेबाना निरोप देत नव्याने नियुक्ती झालेल्या बडाख साहेब यांचा देखिल सत्कार करून स्वागत केले.”
______________________________________________
यावेळी लेखा विभागाचे- श्री. महावीर खोत,बाळासाहेब बोचरे,संतोष राऊत,सतीश शिरसाठ,श्रीनिवास फुगारे,अनिल धोत्रे,विशाल आमटे,विठ्ठल बोरकर,ललित कोतकर, दिपक हरिश्चंद्रे ,रोहित येवले,अमोल काळे, सुधीर बाचकर, अप्पासाहेब रावडे, ई. पर्चेस विभागाचे- श्री.गजानन पाटील,अनिल दळवी, उत्पाद्न विभागाचे- वालचंद मांडगे, शेतकी अधिकारी-सुदाम घुगारकर ,ऊस पुरवठा अधिकारी-अमोल काकडे, टाईम किपर-नितीन तनपुरे ,राहुल तनपुरे, संगणक विभाग- ईरफान पठाण केनयार्ड विभाग- भरत तनपुरे, सिव्हील विभागाचे-महेश गायकवाड,नाजीम देशमुख, गोडाऊन किपर-अशोक चितळकर, नितीन पागिरे, सचिन पटारे, बगँस कँनट्रांक्टर-उद्धव कैतके. वाहन विभागाचे-महेंद्र मराठे, आकाश डहाळे, प्रशासन विभाग-गोरख पगिरे,दिपक लहारे तसेच आदी. कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

 

राहुरी तालुका

अशोक मंडलिक

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
15:18