एकही शेतकरी मदतीपासून वंचीत राहाणार नाही— ना. विखे.

एकही शेतकरी मदतीपासून वंचीत राहाणार नाही— ना. विखे.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
सरकारने दिलेले असून एकही शेतकरी मदतीपासून
वंचीत राहाणार नाही तसेच आनंदाचा शिधा सर्व
लाभार्थ्यांना मिळणार असून यापासूनही कोणीही
वंचीत राहाणार नाही अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
टाकळीभान येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले यावेळी ना. विखे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील,
जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनंत परदेशी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती नानासाहेब पवार, दिपक पटारे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. विखे पाटील पुढे म्हणाले,
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे आणि यापूर्वी मंजूर झालेली मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळावी म्हणून सरकार काम करीत आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.
राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार
असल्याने जनतेच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे.
दिवाळीनिमित्त लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देणारे
महाराष्ट्र राज्य एकमेव असून एकही शेतकरी मदती
पासून वंचीत राहाणार नाही व सर्व लाभार्थ्यांना शिधा
मिळेल यापासूनही कोणीही वंचीत राहाणार नाही याची खबरदारी सरकार निश्चीत घेईल अशी ग्वाही
ना. विखे यांनी दिली.
ना. विखे यांनी टाकळीभान येथे येत असतांना टाकळीभान येथील शेतात जावून नुकसानीची पहाणी
केली.
यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, माजी
सभापती नानासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जेष्ठनेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, तलाठी
अरूण हिवाळे, कृषी सहाय्यक पी डी शिंदे, सुप्रिया धुमाळ,अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे, सुंदर रणनवरे ऑड. दिपक कोकणे, नारायण काळे, बंडू हापसे आदी ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
टाकळीभान — येथे राज्याचे महसुल मंत्री ना.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त
लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.