महाराष्ट्र
अडबंगनाथ संस्थान येथे परम पुज्य राष्ट्रीय संत बाल योगी श्री उमेश नाथजी महाराज यांची भेट

अडबंगनाथ संस्थान येथे परम पुज्य राष्ट्रीय संत बाल योगी श्री उमेश नाथजी महाराज यांची भेट
श्रीरामपूर तालुक्यातील क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठान (भामानगर) या ठिकाणी. १०८ अनंत विभुषित परम पूज्य राष्ट्रीय संत बाल योगी श्री उमेश नाथजी महाराज पीठाधीश्वर श्री क्षेत्र वाल्मिकी धाम उज्जैन राजकीय अतिथी मध्य प्रदेश शासन यांनी अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी अचानक भेट दिली त्यांनी श्री श्री परम पूज्य जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला, ते म्हणाले की स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांनी शिक्षण नसतानी येवढी प्रगती केली , हे पाहून ते भाराऊन गेले एका जंगलात महाराजांनी निसर्ग रम्य वातावरण तयार केले ही भूमी .प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे त्यांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतला. आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आशिर्वाद दिला.