सकाळ समुहातर्फे आयडॉल महाराष्ट्राच्या मानकरी ठरल्या बद्दल नगराध्यक्षा उषा राऊत यांचा खादीग्रामोद्योगच्या वतीने सत्कार

सकाळ समुहातर्फे आयडॉल महाराष्ट्राच्या मानकरी ठरल्या बद्दल नगराध्यक्षा उषा राऊत यांचा खादीग्रामोद्योगच्या वतीने सत्कार
सकाळ समुहातर्फे निवडलेल्या आयडॉल ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नगरचे मानकरी अर्थात कर्जत नगरपंचयातच्या आदर्श नगराध्यक्षा सौ. उषा अक्षय राउत यांना सकाळ सुमुहातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कर्जत तालुका खादीग्रामोद्योग संघाचे चेअरमन महादेव सुरवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. प्रतिभा भैलुमे संचालक राम साळवे, रोहन कदम, लक्ष्मण साळुंके, शोभा डाडर, नगरसेवक अमृत काळदाते, खादीग्रामोद्योगचे सचिव शेळके साहेब आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आपल्या कार्यकाळात कर्जत शहरात अनेक जनहिताची कामे केली आहेत. तसेच नगरपंचयात अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा मधे भरीव कामगिरी केली आहे. तसेच या भागाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच महिलांचे संघटन करून अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले . या सर्व बाबींचा विचार करून सकाळ समुहातर्फे त्यांची अहमदनगर जिल्हयातून आदर्श नगराध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. असुन त्यांना पुरस्कार देण्यात प्रदान करण्यात आला आहे.
नगराध्यक्षा सौ. उषा राऊत या प्रसिध्द उद्योगपती श्री विठ्ठल (पंत) राउत यांच्या सुनबाई आहेत. उषा राउत यांना सकाळ सुमुहातर्फे आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत .