प्रखर राष्ट्रवाद देशभक्ती जोपासण्याचे काम संघात – सुवेद देशमुख

प्रखर राष्ट्रवाद देशभक्ती जोपासण्याचे काम संघात – सुवेद देशमुख
प्रखर राष्ट्रवाद, देशभक्ती, सामाजिक समरसता जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वंयसेवक संघ करत असुन सर्वाना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी गेल्या ९७ वर्षापासून संघाचे कार्य अविरतपणे चालु आहे असे प्रतिपादन रा स्व.संघाचे नासिक विभाग प्रचारक सुवेदजी देशमूख यांनी केले.
बेलापूर येथील रा.स्व. संघाच्या विजय दशमी दसरा उत्सवात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माऊली वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुडे हे होते,तर तालुका सहकार्यवाह निलेशजी हरदास, देविदासजी चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपेंद्र कुलकर्णी यांच्या
।”संघ विजयी पथ पर बढ चले.”। या गीताने करण्यात आली.
आपल्या भाषणात देशमुख म्हणाले भारताची गौरवशाली संस्कृती,परंपरा आहे. आपल्यातील शौर्य,शक्ती,तेजाची उपासना करण्यासाठी या दिवशी शस्राचे पूजन केले जाते असेही ते म्हणाले
अध्यक्षीय भाषणात सुभाष वाघुंडे म्हणाले—देशात वृद्धाश्रमे ही समाजासाठी कलंकित बाब आहे.वृद्धाश्रमे असू नये हे जरी अपेक्षीत असले तरी निराधारांना आधार देणे.ह्याच मुळ उद्देशाने मी वृद्धाश्रम सुरु केलेला आहे राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळे जिवनाता शिस्त लागते आपल्यातील राष्ट्र प्रेम जागृत होते समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतुन सुरु केलेल्या माऊली आश्रमात सध्या १९ आजी आजोबा सेवा घेत आहे .सुमारे २८ आजी आजोबांना मी घरवापसी केल्याचे त्यांनी सांगितले..
यावेळी रा.स्व.संघाचे घोषासह पथसंचलन काढण्यात आले.संघस्थानावर सुर्य नमस्कार,नियुद्ध, अग्र्निप्रलय,प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सुञसंचलंन देवेंद्र गोरे यांनी तर आभार रविंद्र कोळपकर यांनी मानले.कार्यक्रमास परिसरातील संघप्रेमी नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते,