हरेगाव मतमाउली यात्रेचा अमृत महोत्सव साजरा ख्रिस्ती किर्तनकार बन्सी महाराज साळवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान.

हरेगाव मतमाउली यात्रेचा अमृत महोत्सव साजरा ख्रिस्ती किर्तनकार बन्सी महाराज साळवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान.
हरेगाव मतमाउली यात्रेचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना फा.सिक्स यांच्या बरोबर ग्रामीण भागात सायकल, बैलगाडी वर प्रवास करत अहोरात्र मातेचा महिमा पसरविण्याचे महनीय कार्य करणारे ख्रिस्ती समाजातील पहिले कॅथोलिक ख्रिस्ती किर्तनकार बन्सी महाराज साळवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा भव्यदिव्य सन्मान सोहळा ख्रिस्ती समाज भूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात येत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील बंगलोर म्हैसूर यांठिकाणी किर्तनरूपी सेवा व समाज प्रबोधनाचे अतुलनीय कार्य अखंडिपणे केले.हरिगांव यात्रेमध्ये ग्रामीण भागातील भजनी मंडळाला व्यासपीठ मिळावे यासाठी सन 1979 पासून ख्रिस्ती भजन संध्या कार्यक्रमाची सुरुवात केली ती आजतागायत सुरू आहे आणि त्याची व्याप्ती देखील वाढली आहे.त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली हेच आम्ही आमचे परमभाग्यच समजतो असे प्रतिपादन खिस्ती भजनी संध्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्व.स्वप्निल आढाव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आढाव यांनी केले.
याप्रसंगी संत तेरेजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.डॉमिनिक रोझारियो यांच्या शुभहस्ते हरिगांवचे सुपुत्र किर्तनकार बन्सी महाराज साळवे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी फा सचिन मुनतोडे,कामगार नेते नागेशभाई सावंत,आपचे तालुकाध्यक्ष तिलक डुंगुरवाल,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, अमरदीप भजनी मंडळाचे संस्थापक राजेंद्र मगर वअध्यक्ष किरण साळवे,जीम प्रशिक्षक अनिल साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती
भजन संध्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत भजनी मंडळांनी सुश्राव्य भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली प्रत्येक भजनी मंडळाचा यथोचित सन्मान संत तेरेजा चर्च व अमरदीप भजनी मंडळ यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.भजन संध्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले.तर आभार राजेंद्र मगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत सातदिवे,विजय कोपरे, संजय मोकळं,राजु पठारे यांचे विशेष सहकार्य लाभले.