*गेवराई मधून अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता*तक्रार घेत नाही उद्या सकाळी पाहू पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा*

*गेवराई मधून अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता*
*तक्रार घेत नाही उद्या सकाळी पाहू पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा*
अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण गेवराई तालुक्यात चांगलेच वाढले आहे अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेत गेवराई शहरात काल दोन वर्ष नंतर श्री च्या पालखीचे आगमन झाले.या पालखी सोहळ्यात, खेळणी विकणारे लखन बेगाजी पवार रा.पंजाब हे पूण्यावरून माऊलीच्या सोहळ्यात खेळणी विकण्यासाठी आले होते त्यानंतर पंढरपूरहुन श्रीच्या पालखी सोबत खेळणी विकत असतांना काल गेवराई नवीन बस स्थानक समोर लखन पवार यांची दुकान लावण्यात आली होती ही दुकान त्यांची मुलगी नीलम लखन पवार वय 17 वर्ष ही चालवत असुन, तिने काल दि. 21 गुरुवार रोजी सहा वाजता गेवराई च्या बसस्टँड मध्ये शौचालयासाठी जात आहे म्हणून सांगून गेली त्यावेळेस तिने तिच्या लहान बहिणीला दुकानावर थांबवले होते एक तास गेला तरी पण ती सायंकाळी उशिरापर्यंत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली त्यांनी मुलीचा सर्वत्र शोधाशोध सुरु केला. सगळी कडे शोध घेऊनही मुलीचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी अखेर गेवराई पोलिस ठाणे गाठले. परंतु गेवराई पोलीस स्टेशन या ठिकाणी रात्री तक्रार द्यायला गेले असता पोलीस स्टेशन येथिल कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पाहू असे सांगितले व त्यांची तक्रार घेतली नाही, सदरील मुलीचा तपास करण्यासाठी गेवराई पोलीस स्टेशन कसल्याही प्रकारे सहाय्यता करत नाही अजूनही त्यांची तक्रार घेतली नाही सदरील घटनेमुळे पालकांच्या चिंता चांगल्याच वाढल्या व शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.