रखडलेले टाकळीभान येथील बस स्थानकाच्या बांधकामाचा तिढा सुटला दोन दिवसात बस स्थानकाच्या कामाला सुरवात केली जाईल आ. लहु कानडे

रखडलेले टाकळीभान येथील बस स्थानकाच्या बांधकामाचा तिढा सुटला दोन दिवसात बस स्थानकाच्या कामाला सुरवात केली जाईल आ. लहु कानडे
टाकळीभान प्रतिनिधी :- गेले काही दिवस रखडलेले टाकळीभान येथील बस स्थानकाच्या बांधकामाचा तिढा सुटला आसुन येत्या दोन दिवसात बस स्थानकाच्या कामाला सुरवात केली जाईल असे आ. लहु कानडे यांनी येथील बस स्थानकाच्या जागेची प्रत्यक्षी पहाणी करुन पञकारांशी संवाद साधताना सांगितले.
बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्यमार्गाच्या रस्ता रुंदिकरणाच्या कामासाठी येथील उत्तमआवस्थेतील जुने बस स्थानक पाडण्यात आले होते. टाकळीभान ते श्रीरामपुर या दरम्यानच्या राज्यमार्गालगतच्या भोकर, खोकर व वडाळा महादेव येथील बस स्थानक रुंदीकरणाच्या कामात आडथळा ठरत आसल्याने ते ही पाडण्यात आले होते. श्रीरामपुर मतदार संघाचे आ. लहु कानडे यांनी ही सर्व पाडलेली बस स्थानके पुन्हा बांधण्यासाठी आमदार निधीतुन निधी दिला होता. त्यामुळे टाकळीभान बस स्थानकाचा अपवाद वगळता इतर बास स्थानक दोन वर्षापुर्वीच बांधुन पुर्ण करण्यात आली आहेत.
येथीन जुन्या बास स्थानकाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा निधी गेली दोन वर्षे पडुन आहे. याबाबत काल गुरवार २० जुलै रोजी आ. कानडे यांनी हा रखडलेला प्रश्न सोडवण्या कामी येथे प्रत्यक्ष भेट देत माजी सभापती नानासाहेब पवार यांची भेट घेवुन या प्रश्नावर चर्चा केली. नियोजित शासकिय जागेवरील हलवाई संदिप सिनगारे यांचीही भेट घेवुन बसस्थानकाच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा काढल्याने जागेचा प्रश्न मिटल्याने रखडलेले बस स्थानकाचे काम येत्या दोन दिवसात सुरु करणार आसल्याने आ. कानडे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रा. कार्लस साठे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, बापुसाहेब शिंदे, दादासाहेब कापसे, रामनाथ माळवदे, प्रल्हाद कापसे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.