*पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभा मतदारसंघात मतदारांची विक्रमी वाढ तृतीयपंथीय मतदारांची संख्या 151 वाढली*

*पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभा मतदारसंघात मतदारांची विक्रमी वाढ तृतीयपंथीय मतदारांची संख्या 151 वाढली*
प्रतिनिधी आरिफभाई शेख
पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार संघाची अंतिम मतदार यादी गुरुवारी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली भारत निवडणूक आयोग सूचनेनुसार राबविण्यात आलेले विशेष संक्षिप्त पुनर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत एक जानेवारी 2023 या अर्जाचा दिनांक वर आधारित सदर यादी आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये उच्चांकित मतदार संख्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे संक्षिप्त पुनर निरीक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार अंतिम यादी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी पाच जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार 1 जानेवारी 2023 दिनांक वर आर्यता दिनांक वर आधारित विशेष संक्षिप्तपणे निरीक्षण कार्यक्रम नऊ नोव्हेंबर 2022 पासून राबविण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या उपस्थित करण्यात आला होता. संबंधित माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 79 लाख 51 हजार इतकी एकूण मतदार संख्या असून 74 हजार 470 मतदार संख्येची भर पडलीय, सदर आकडेवारी अंतिम मतदार यादी प्रमाणे असून पुरुष मतदार संख्या 35 हजार 598 महिला मतदार संख्या 38 हजार 721 इतकी आणि तृतीयपंथी मतदारसंघ 151 वाढलेली आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 79 लाख 51 हजार 420 इतके मतदार समाजात आहेत त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 41 लाख 66 हजार 2565 महिला मतदारसंघांची संख्या 37 लाख 84 हजार 660 तृतीयपंथ मतदारांची संख्या 495 इतकी झालेली आहे अंतिम मतदार यादी पाण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय उपलब्ध करून दिलेली असल्याने नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याची खात्री करण्यात येणार आहे तसेच
https://www.nvsp in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांची नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहेत पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केले आहे