मोहन दराडे जलसंपदाविभागातून सेवानिवृत्त*–

*मोहन दराडे जलसंपदाविभागातून सेवानिवृत्त*–
–जलसंपदा विभागाचे मोहन दराडे सेवानिवृत्त झाल्याने सत्कार करताना उपविभागीय अभियंता शरद कांबळे
सोनई–महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागातील मोहन म्हपाजी दराडे रा.वंजारवाडी ता.नेवासा येथील यांनी ३७ वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त झाले आहे, पण त्यांचा यापुढील कार्यकाळ खरी जीवन जगण्याची नवीन आवृत्ती सुरू झाल्याचे मत जलसंपदा विभागाचे उप विभागीय अभियंता शरद कांबळे यांनी व्यक्त केले. राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाखाधिकारी बी.व्ही.घोरपडे हे होते.
या प्रसंगी मोहन दराडे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,यावेळी दराडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मला अधिकाऱ्याच्या मार्गदर्शन खाली व कर्मचाऱ्यांच्या सहकार्य मुळे सेवा करण्याची संधी मिळालीचे सांगून सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास बी.व्ही.घोरपडे, वी. भा.आरगडे, आर.ए. पिपळे, आर.ए. बोरुडे,एम.एम.भिसे,के.रा.कर्डीले, सौ.सुं.ना.खपके,सौ.बुंबुक हे उपस्थित होते. आभार श्री.एस.बी.दराडे यांनी मानले.