उपसरपंच कडून सरपंचाच्या कामात हस्तक्षेप सरपंचाची तक्रारीची सुनावणी गटविकास अधिकारी दालनात

टाकळीभानच्या उपसरपंच यांचेकडून सरपंच यांच्या कामकाजात हस्तक्षेप याबाबत सरपंचांची तक्रार… आज गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री संतोष उर्फ कान्हा अशोक खंडागळे यांच्याकडून सरपंच सौ अर्चना यशवंत रणनवरे यांच्या कामकाजात हस्तक्षेप करतात याबाबत चा तक्रार अर्ज दि. 27 जुलै 2022 रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती श्रीरामपूर यांकडे केला आहे. या अर्जात नमूद केले आहे की,मी मौजे टाकळीभान येथील मागासवर्गीय महिला सरपंच सौ अर्चना यशवंतराव रणनवरे असून आमच्या ग्रामपंचायत मध्ये मासिक सभेच्या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक माझ्या कामात हस्तक्षेप करतात, मासिक सभा सुरू असताना बाहेरील सभागृहात उपसरपंच यांचे कडून गुंड प्रवृत्तीचे लोक आणून बसवले जातात. कार्यालयीन वेळेत माझे कामकाज सुरू असताना उपसरपंच यांच्याकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑफिसमध्ये माझ्यासमोर विनाकारण बिगर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन येऊन बसतात. व दबाव आणतात. ते ग्रामपंचायत सदस्य नाही त्यांना मासिक सभेत बसण्यास मज्जाव करावा. मागील मासिक सभेचा अनुभव पाहता त्यांना बसण्यास मज्जाव करावा व जे ग्रामपंचायत सदस्य आहे ते मासिक सभेला न येता घरातील इतर नातेवाईक सभेला पाठवतात व माझ्या कामात हस्तक्षेप करतात. तरी सदर शासन परिपत्रक क्रमांक झेडपी ए१००५/९१ मू स/ प क्र.१०४/ पंरा.१ दि. ६ जुलै २००६ नुसार पदाधिकारी यांचे वर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती यांकडे दिला आहे तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात ४ ऑगस्ट 2022 रोजी सकाळी/दुपारी ३.०० वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. सदर सुनावणी वेळी आपले लेखी/ तोंडी म्हणणे आवश्यक त्या पुराव्याच्या कागदपत्रासह समक्ष हजर राहावे काही अपरिहार्य कारणास्तव सुनावणी झाली नाही तर पुढील सुनावणीची वेळ व तारीख कळवली जाईल. या प्रकारची नोटीस गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक टाकळीभान यांना काढली असून सुनावणीस हजर राहावे अशा सूचना नोटीस द्वारे केली आहे.