*आळंदीत अतिक्रमण विरोधी कारवाई*

*आळंदीत अतिक्रमण विरोधी कारवाई*
*कारवाईत रस्त्यावर अडथळा आणणाऱ्या वाहनांना ही चलन फाडत दंड*
आळंदी नगरपरिषद,आळंदी पोलिस,आळंदी वाहतूक विभाग यांचे संयुक्तपणे कारवाईत आज आळंदीत प्रमूख रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली, रस्त्यावर तसेच फुटपाथ वर असणाऱ्या विवीध प्रकारची दुकाने, हातगाडी, पथारी वाले यांच्या हातगाड्या, टपरी, नाम फलक असलेले अडथळे हे जप्त करण्यात आले, यावेळी मोठा पोलिस फौज फाटा तसेच आळंदी नगर परिषद कर्मचारी , शिपाई,ट्रॅफिक पोलिस विभाग कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईत,बरेच दुकानदार यांचे शी वादावादी झाली, वडगाव चौक येथिल रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई का करत नाही अशी विचारणा नागरिक करत होते, तर जलाराम मंदीर परीसरात मोठा वाद दुकानदार यांनी घातला,पोलिस आणि दुकानदार यांच्यात वादावादी झली, कायम कारवाई करणार का तात्पुरती अशी विचारणा सदर दुकानदारांकडून होत होती. आम्हीं काढून घेतो अशीही मागणी ते करत होते, रस्त्यात उभ्या आसलेल्या गाड्यावर सरसकट अडथळा आणला म्हणून नो पार्किंग चा दंड वाहतूक पोलिस यांना पोलिस अधिकारी जागेवर देत होते, दरम्यान कारवाई स अडथळा आणला जाऊ नये यासाठी पोलिस कुमक , महीला पोलिस दोन एपी आय दर्ज्याचे अधिकारी हजर होते, मुख्याधिकारी अंकुश जाधव, कर्मचारी सचिन गायकवाड, किशोर तरकसे, मिथील पाटिल,पोलिस अधिकारी रमेश पाटिल, गोपनीय बारनिशी मच्छिंद्र शेंडे, कारवाईत सहभागी होते