श्रीरामपूर येथे वंचित बहुजन आघाडीची उत्तर जिल्हा आढावा बैठक पार.

श्रीरामपूर येथे वंचित बहुजन आघाडीची उत्तर जिल्हा आढावा बैठक पार.
या बैठकामध्ये येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पॅनल लावण्यासाठी विस्तारित चर्चा करण्यात आली.जिल्हा महासचिव अनिलराव जाधव जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे व सर्व तालुकाध्यक्षांनी सर्व जिल्हा कमिटीने आपल्या तालुक्यामध्ये वंचित चा संपूर्ण पॅनल उभा राहील हे आश्वासित केले तसेच अनिलराव जाधव यांनी राहुरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद चे कमीत कमी ३ गट आणि पंचायत समितीच्या ८ ते ९जागा निवडून येतील असा विश्वास या बैठकीत व्यक्त केला. तसेच देवळाली नगरपालिका आणि राहुरी नगरपालिकेला सुद्धा संपूर्ण पॅनल लागेल असे आश्वासित केले.
यावेळी बैठकीला राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष देशाताई शेख, पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे निरीक्षक सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे, जिल्हा महासचिव अनिलराव जाधव,जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विजय मकासरे,जिल्हा सल्लागार मधुकर साळवे, जिल्हा सचिव सुनील ब्राह्मणे युवाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरण दादा त्रिभुवन, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके राहुरी तालुका कार्याध्यक्ष अनिल भारती, तसेच राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे देवळाली शहर उपाध्यक्ष नानाभाऊ उंडे तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई बाचकर, वंचित प्रणित एकलव्य आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई गायकवाड तसेच राहुरी तालुका अध्यक्ष वंदनाताई भारती, राहुरी तालुका महासचिव अनिता ताई जगधने, जिल्हा सदस्य मीराताई थोरात तसेच अकोला संगमनेर राहता कोपरगाव शिर्डी नेवासा या ठिकाणचे तालुकाध्यक्ष व तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी यावेळी या बैठकीला हजर होते.