धार्मिक

उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे आवाहन*

*उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे आवाहन*

 

आळंदी देवाची येथील तसेच आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केळगाव चिंबळी कुरळी या प्रभागातील सर्व गणेश मंडळ यांची आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस स्टेशन शांतता कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आळंदी पोलीस स्टेशन येथे बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे शांतता कमिटी सदस्य डी डी भोसले व प्रकाश कुऱ्हाडे माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे आनंदा मुंगसे शिवसेना नेते उत्तम गोगावले बाळासाहेब चौधरी व विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

सदर बैठकीमध्ये गणेश उत्सवामध्ये येणाऱ्या अडीअडचणी तसेच मिरवणुकी दरम्यान विलंब लागणाऱ्या त्रुटी बाबत चर्चा करण्यात आली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी मिरवणुकी दरम्यान येणाऱ्या अडथळ्यामुळे विसर्जन मिरवणूक लांबतात त्यासाठी एम एस ई बी कार्यालयातील कर्मचारी अजित गोंधळे यांना सदर त्रुटी आणि अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी सूचना केल्या त्याचबरोबर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा होणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेत माहिती पटवून दिली विविध मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी चर्चेमध्ये सहभागी सहकारी आणि चौधरी पूर्ण गणेश उत्सव साजरा करू अशी ग्वाही दिली आळंदी पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील वेळेप्रमाणे विसर्जन मिरवणूक या वेळेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी नियमांचे पालन करत सर्वांनी सहकार्य करावे अशी आवाहन केले आहे.

 

त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशन मध्ये प्रथमच एक खिडकी योजनेचे आयोजन करण्यात आले असेल या माध्यमातून गणेश मंडळांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी पायपीट करावी लागणार नाही तसेच त्यासाठी विशेष कक्ष आळंदी पोलीस स्टेशन येथे उभारण्याचे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी विशेष प्रयत्न केलेत त्यासाठी लागणारे सर्व सुविधा आळंदी पोलीस स्टेशन पूर्वी अशी माहिती गोडसे यांनी दिली. गणेश मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांना ओळख पटावी यासाठी ओळखपत्र प्रदान करावे जेणेकरून माता-भगिनी आणि वयोवृत्त यांना स्वयंसेवक म्हणून मदत करणे सोपे होईल या सूचनांचाही सर्व गणेश मंडळांनी स्वीकार केला चिंबळी केळगाव येथील माजी सरपंच बनकर पोलीस पाटील युवराज वहिले यांनी केंबळे केळगाव भागातील गणेश उत्सवांसाठी परवानगी बाबत आवश्यकता असणाऱ्या बाबी बाबत चर्चा केली. आळंदी गणेश उत्सव उत्साहात आनंदात पार पाडणे ही माझी जबाबदारी यासाठी सज्ज रहा अशा सूचना वरील सर्वच मान्यवर यांनी केली पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम विसर्जन कुंड वाढवण्यात आल्याचे माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आळंदी नगर परिषदेचे बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड एम एस सी बी चे कर्मचारी अजित घुंडरे सर्व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सदर बैठकीला उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे