समता, बंधुता ,चा संदेश देत मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन*

*समता, बंधुता ,चा संदेश देत मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन*
जे जे भेटे भूत ..ते ते मानिजे भगवंत.. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्याय 118 वी ओवी. जी शिकवण देते त्याच अनुकरण करत.आळंदी पोलीस स्टेशन. आळंदी नगरपरिषद.आळंदी समस्त ग्रामस्थ. यांचे वतीने आळंदी मशिदी मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जातीय सलोखा, समता आणि बंधुताचा संदेश देत , आळंदी पोलीस बांधवांनी पुढाकार घेत समस्त ग्रामस्थ आणि आळंदी नगरपालिकेने समन्वय साधन मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी चे आयोजन केले. आणि येणाऱ्या रमजान ईद चे अनुषंगाने शुभेच्छा दिल्या आहेत आळंदी या संतांच्या भूमीमध्ये जे जे भेट भूत ते ते मानिजे भगवंत… भक्ती योग निश्चित जाण माझा या ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील 118 वी ची अनुकरण करत आळंदीकर ग्रामस्थ आळंदी पोलीस स्टेशन आणि आळंदी नगर परिषदेने मुस्लिम बांधवांना घास भरवत शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमा प्रसंगी मुस्लिम मशिद कमिटीचे अध्यक्ष मूसा हकीम यांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशन. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुस्लिम बांधवांच्या संपूर्ण समाजाच्या वतीने आळंदीकर ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात माजी नगरसेवक डी डी भोसले यांनी स्वीकारला.त्याबरोबरच आळंदीकर ग्रामस्थ यांचे मानकरी पत्रकार आरिफ शेख यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश पाटील गुन्हे विभाग यांचा सन्मान मुस्लिम बांधवांच्या वतीने तर एडवोकेट सोहेल शेख यांच्यावतीने मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद कैलास केंद्रे यांचा सन्मान करण्यात आला.वरील प्रतिनिधीक सन्मान आळंदी मुस्लिम मस्जिद मध्ये करण्यात आले. नगरपरिषद चे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची विशेष उपस्थिती होती तसेच माजी नगरसेवक डीडी भोसले.माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे.माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले. शिवसेना नेते उत्तम गोगावले. माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे. माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे. भाजपा महाराष्ट्र किसान मोर्चा आघाडी प्रमुख संजय घुंडरे. ज्ञानेश्वर घुंडरे . माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी.तसेच मुस्लिम बांधवांमध्ये भाईचारा कमिटीचे अध्यक्ष सुलतान शेख. एडवोकेट सोहेल शेख. निसार सय्यद. मुसा हकीम. हमीद शेख. मोहसीन शेख.असगर अन्सारी. वरील सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद व्यक्त करत उत्साहाच्या वातावरणात या इतर पार्टीचे समारोप करण्यात आले पोलीस निरीक्षक बीएम जोंधळे पोलीस हवालदार जाधव.पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे (गुप्त वार्ता विभाग) मुस्लिम बांधवांनी आळंदी पोलीस स्टेशन यांचे विशेष आभार मानत आळंदीकर ग्रामस्थ आणि आळंदी नगरपरिषद यांना धन्यवाद दिले आहे