…… येथील 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी

उस्मानाबाद येथील 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी …
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे आदेश…
मागासवर्गीय समाजातील 5 वर्षीय अंगणवाडीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव डॉ केवल ऊके प्रदेश सचिव वैभव गिते
राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे यांना पत्र पाठवून सदर घटनेचा निषेध करून आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद जिल्हा टिमने या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करून आरोपीस कडक शिक्षा होण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्ह्यातील वातावरण तंग झाले आहे.
पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळण्याकरिता राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कार्यालय पुणे येथे जाऊन भेट घेऊन निवेदन दिले याची आयोगाने गंभीर दखल घेऊन उस्मानाबाद जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जलद अहवाल मागितला असून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी उस्मानाबाद यांना घटनास्थळी भेट देऊन अहवाल मागितला आहे.तसेच एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयातील गृह विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना भेटून कडक कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे धानोरी ता लोहारा जि उस्मानाबाद येथील पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन दुष्कर्म करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी कायदेशीर मागण्यांचे निवेदन परांडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर (कांबळे), पोलीस निरीक्षक मा सुनिलजी गिड्डे यांचे मार्फत मुख्यमंत्री महोदय व शासनास पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सदर खटला हा जलदगती न्यायालयात दाखल करुन खटला दोन महिण्याच्या आत निकाली काढुन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा. विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करुन आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी.तसेच पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात यावी. यासह विविध मागण्या तहसिलदार यांचेमार्फत दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटणेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जवळा गावचे माजी सरपंच नवजीवन चौधरी, राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन संघटणेचे, जिल्हा सचिव काशिनाथ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष कानिफनाथ सरपने, जिल्हा युवकाध्यक्ष आकाश चव्हाण, तालुका संघटक अशोक चव्हाण, सावता परीषदेचे पै राहुल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी सोनवणे, अरविंद चव्हाण, सोहम चव्हाण, नंदकुमार चोळसे, प्रशांत गोमासे, आनंद निकाळजे, आदीसह अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली व पुणे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सदर घटनेचा तात्काळ अहवाल मागितला असून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण उस्मानाबाद यांना घटनास्थळी भेट देऊन अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.