पोलीस स्टेशन वसाहतीतून, आवारातून जप्त मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपीस सदर मुद्देमाल वाहून देणाऱ्या रिक्षा चालकास व चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास अटक .

पोलीस स्टेशन वसाहतीतून, आवारातून जप्त मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपीस सदर मुद्देमाल वाहून देणाऱ्या रिक्षा चालकास व चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास अटक .
राहुरी पोलीस स्टेशन गु र न 155 /23 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 458,380 अन्वये दिनांक14 /02/23 रोजी गुन्हा दाखल असून दाखल गुण्हयात अज्ञात आरोपीने पोलीस स्टेशन वसाहतीत ठेवलेला मोटार पंप, यांत्रिक पॅड, जप्त वाहनाच्या गाडीचे सायलेन्सर असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वसाहतीतील इमारत क्रमांक 3 येथे घरफोडी चोरी करून व वसाहतीत ठेवलेल्या वाहनांचे पार्ट खोलून चोरी केलेला सदर गुन्ह्याचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषनावरून आरोपी 1)विलास उर्फ छत्तीस भास्कर जगधने, वय 46 वर्ष राहणार लक्ष्मी नगर,2)अमोल नारायण जगधने, वय पंचवीस वर्षे राहणार लक्ष्मी नगर व या आरोपींकडून सदर चोरीचा मुद्देमाल घेणारा 3) रामदास उद्धव म्हेत्रे वय 55 वर्ष राहणार राहुरी यांना दिनांक 15 2 2023 रोजी अटक करून त्यांचा आज दिनांक 17 2 2019 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला 30000/- रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्हा करणासाठी वापरलेली रिक्षा क्रमांक MH15BD 5068 किंमत 40000/- रुपये असा एकूण 70000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पुढील तपास पो हवा सुरज गायकवाड करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, नदीम शेख.गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, महिला पोलीस हवालदार राधिका कोहकडे, चापोहेकॉ शकूर सय्यद यांच्या पथकाने केलेली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन द्वारे सर्व भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना समज देण्यात येते की, आपण कोणतीही जुनी चोरीची मोटर पंप , इलेक्ट्रिक वायर , जुने वाहनाचे स्पेअर पार्ट खरेदी करू नये. भंगार खरेदी करताना ती चोरीची नसल्याची खात्री करावी तसेच तिच्या मालकी हक्काचा पुरावा आपल्या रजिस्टरला ठेवावा. अन्यथा चोरीची वस्तू खरेदी केली असल्यास आपनावर या कारवाई प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच कुणी चोरीची मालमत्ता विक्रीसाठी आलेला आहे अशी माहिती मिळाल्यास ती माहिती पोलीस स्टेशनला पुरवावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
तसेच सीसीटीव्ही बसवून घ्यावेत