विद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच खरे कलावंत कलाकार घडत असतात.

विद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच खरे कलावंत कलाकार घडत असतात.
टाकळीभान प्रतिनिधी: विद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच खरे कलावंत कलाकार घडत असतात, असे प्रतिपादन टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीरामपूर नक्षत्र डान्स अकॅडमीचे संचालक राहुल उपाध्ये यांनी केले.
यावेळी उपाध्ये बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामुळे स्टेज डेरिंग वाढवून त्यांच्यातील दडलेल्या उपजत कला बाहेर येतात, व त्यातून त्यांच्या करिअरचा मार्ग देखील सापडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी न घाबरता सहभाग वाढवावा असे ते म्हणाले.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणा बालकलाकार सा रे ग म प लिटिल चॅम्पियन जयेश खरे , रयते जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, ज्येष्ठ सदस्य मंजाबापू थोरात ,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राहुल पटारे, सरपंच अर्चनाताई रणनवरे, ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मणराव कदम गुरुजी, शाळा पालक संघाचे पाराजी पटारे, एपीआय अतुल बोरसे, श्रीधर गाडे,नारायण काळे, पर्यवेक्षक बनसोडे सर आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून व वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य बी टी इंगळे यांनी केले.
या प्रसंगी सा रे ग म प लिटिल चॅम्प जयेश खरे याने आपल्या आवाजात श्रवणीय गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रम मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यात सहभाग घेऊन अप्रतिम नृत्य व कला सादर केली त्यास उपस्थित ग्रामस्थ पालकांनी भरभरून दाद दिली व आपल्या पाल्यांचे कौतुक केले.
कार्यक्रम प्रसंगी प्रथम तीन उत्कृष्ट नृत्यास माजी विद्यार्थी संघटनेच्या तीन सन्मानचिन्ह ठेवण्यात आले होते त्याचे वितरण प्रगतशील शेतकरी श्रीधर गाडे, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष अर्जुन राऊत, सुरेश वाघुले ,सचिन माने ,रविंद्र मेहेत्रे, सुरेश गलांडे आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण गोरडे एस.एल. व वैजयंती सोनवणे मॅडम यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ , माता -पिता पालक वर्ग, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पो.कॉ. कराळे पो. हे. चांद भाई शेख ,पोलीस मित्र बाबा सय्यद यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका चाबुकस्वार आदिनाथ पाचपिंड सर ,बनकर सर यांनी केले. उपस्थित बद्दल सर्वांचे आभार विद्यालयाच्या वतीने सागर काळे सर यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी परिश्रम घेतले.