बेलापूर -खंडाळा-अस्तगाव या रस्त्याला निधी दिल्याबद्दल खासदार सदाशिव लोखंडे यांचा सत्कार

बेलापूर -खंडाळा-अस्तगाव या रस्त्याला निधी दिल्याबद्दल खासदार सदाशिव लोखंडे यांचा सत्कार
बेलापूर-खडाळा-अस्तगाव या कुऱ्हे वस्ती रस्त्याच्या उर्वरित कामाला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू देऊ असे आश्वसन खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील कुऱ्हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.
कुऱ्हे वस्ती वरील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक तसेच कुऱ्हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या वतीने खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधी मधून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व नुकतेच त्या निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. याबद्दल श्री. लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात बेलापूर -खंंडाळा-अस्तगाव(प्रजिमा१२)हा रस्ता कु-हे वस्ती,जवाहरवाडी,टिळकनगर,रांजणखोल,खंडाळा,अस्तगाव असा आहे.हा रस्ता वर्दळीचा असून वाहतुकीसाठी महत्वाचा आहे.तसेच हा रस्ता झाल्यास शिर्डी या तिर्थस्थळला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा होणार आहे.या रस्त्यामुळे बेलापूर -श्रीरामपूर रस्त्यावरचा वाहतुकीचा भार कमी होणार आहे. सध्या हा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहतुकीसाठी अडचणीचा झाला आहे.यामुळे सदर रस्त्याचे नुतणीकरण व मजबुतीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी खासदार निधीतून या रस्त्याचे कामासाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे, प्रभात कुऱ्हे,अशोक कुऱ्हे,बापूसाहेब कुऱ्हे, सुनिल जाधव, दत्ता साळुंके, महेश कुऱ्हे, प्रफुल्ल कुऱ्हे, बापूसाहेब निर्मळ आदी उपस्थित होते.