डाॅ.सुनिता शिंदे सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने सन्मानीत.

डाॅ.सुनिता शिंदे सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने सन्मानीत.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील माहेर व संगमनेर तालुक्यातील आश्वी उंबरी सासर असणार्या डाॅ.सुनिता शिंदे यांना नूकतेच औरंगाबाद येथील सावित्री शक्तीपीठ या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
राजकीय, सामाजिक, शैक्षणीक व सांस्कृतीक क्षेत्रात प्रगल्भ असलेला जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. याच भूमीची सुकन्या असणार्या सुनिता शिंदे यांचे माहेर टाकळीभान तर सासर आश्वि उंबरी आहे. त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड. झालेले मात्र त्यांनी पी एच डी विशेष सामाजिक व पर्यावरण विषय घेवून केली. तेंव्हाच त्यांचे मन त्यांना शांत बसू देत नव्हते. त्या काळात महात्मा फुले यांच्या मदतीने सावित्रीबाई फुले यांनी केलेले महान कार्य डोळ्यासमोर ठेऊन सध्यस्थितीत सामाजिक व पर्यावरणाबाबतची परिस्थिती बिकट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी समाज जागृती व्हावी या करीता त्यांनी चित्रपट क्षेत्र निवडले. अल्पावधीतच राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर फुले दाप्मंत्यांचा विचार पोहचावा या हेतूने प्रेरीत होवून जिंदगानी या चित्रपटाची निर्मीती करून त्या माध्यमातून सामाजिक प्रश्न समाजासमोर मांडले.
या सर्वोत्तम कामाबद्दल औरंगाबाद येथील सावित्री शक्तीपीठ संस्थेने विशेष कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याची माहीती संस्थेचे दशरथ कुळधरण यांनी दिली. त्याचबरोबर सामाजिक दृष्टीकोण बघून डाॅ. सुनिता शिंदे यांची निवड पुणे येथील सावित्री शक्तीपीठ महाराष्र्ट “सावित्री अर्थ समिती” च्या उपाध्यक्ष पदी करण्यात आली.
या प्रसंगी बोलताने डाॅ.शिंदे म्हणाल्या की, आज समाज अंत्यत बिकट परिस्थितीत मार्गक्रमण करीत आहे. आजमितीला बेसुमार वृक्षतोड होत आहे. तसेच सामाजिक परिस्थिती विचित्र होत चालली आहे. यावर समाज प्रबोधन कार्य हाती घेतले असून फुले दाम्पत्य विचाराने प्रेरीत असणार्या या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. मी ग्रामीण भागातील सावित्रीची लेक असून आता शहरी व ग्रामीण दोन्ही भागातील प्रश्न समजून घेवून महिला विषयावर उत्तम कार्य करून महिलांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगीतले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. टाकळीभान येथील डाॅ.बाळासाहेब लोखंडे तसेच माजी ग्रा.पं.सदस्य अविनाश लोखंडे यांच्या त्या भगिणी आहेत.