भेर्डापूर सोसायटीच्या त्रिशंकू लढतीत मारली शेतकरी विकास मंडळाने बाजी.

भेर्डापूर सोसायटीच्या त्रिशंकू लढतीत मारली शेतकरी विकास मंडळाने बाजी.
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या निवडणुकीमध्ये त्रिशंकू लढत झाली. यामध्ये शेतकरी विकास मंडळाने बाजी मारत गावकरी विकास मंडळाचा तसेच लोकसेवा मंडळाचा 13/0 ने पराभव करत विरोधकांचा धुव्वा उडवला. यामध्ये कालच निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये शेतकरी विकास मंडळाचे श्री सुनील शिवाजी कवडे चेअरमन पदी तर व्हा.चेअरमन पदी आविन अण्णासाहेब कहांडळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच निवडून आलेले दत्तात्रय पोळ ,निलेश कवडे ,अनिल देशमुख, विजय काळे, विश्वास तनपुरे, विठ्ठल तुपे ,शशिकांत साळे, हौशीराम कहांडळ, सौ. रूपाली कवडे, सौ.उषा कहांडळ या नवीन संचालकाचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव विठ्ठल कहांडळ संतोष पवार सहकारी अमोल कापसे सहकारी भाऊसाहेब गवळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सुनील कवडे यांनी सर्व सभासद मतदार बंधू भगिनींचे आभार मानले.