चेअरमन पदी आशिष विठ्ठल बिडगर तर व्हा.चेअरमन पदी संपत रामा विटनोर यांची बिनविरोध निवड

चेअरमन पदी आशिष विठ्ठल बिडगर तर व्हा.चेअरमन पदी संपत रामा विटनोर यांची बिनविरोध निवड
मांजरी ( वार्ताहर) राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मांजरी सोसायटीच्या चेअरमन पदी चंद्रगिरी परिवर्तन मंडळाचे आशिष विठ्ठल
बिडगर तर व्हा.चेअरमन पदी संपत रामा विटनोर
यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सत्ताधारीचंद्रगिरी जनसेवा मंडळाचा धुवा करत चंद्रगिरी परिवर्तन मंडळाने सत्ता स्थापन केली. आज रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एन डी खंडेराय यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम सेवा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी चेअरमनपदासाठी आशिष विठ्ठल बिडगर यांच्या नावाची सूचना चोपडे भानुदास भिमाजी यांनी मांडली तर त्यास अनुमोदन तुषार बाबासाहेब विटनोर यांनी दिले तसेच व्हाईस चेअरमन पदसाठी संपत रामा विटनोर यांच्या नावाची सूचना पाटीलबा बाचकरl यांनी मांडली त्यासअनुमोदन भाऊसाहेब गंगाधर विटनोर यांनी दिले
चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी नवनिर्वाचित संचालक
मधून वरील नावांचा ठराव सर्वानुमते मंजूर होऊनबिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठांच्या विरोधात नऊ युवकांची फळी उभी राहून सभासदांचा विश्वास सार्थ ठरत युवकांनी सोसायटीमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणली आणि एक इतिहास रचला नवीन संचालक व चेअरमन व्हा चेअरमन यांनी विकासाची कास धरून सेवा संस्थेचा विकास करावा आणि सभासदांचा विश्वास सार्थ करावाअसे डॉक्टर प्राध्यापक भानुदास चोपडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
यावेळी गोरख विटनोर, भाऊसाहेब विटनोर ,राजेंद्र बिडगर, भाऊसाहेब बिडगर, पोपट भगत, दत्तात्रय भगत ,भानुदास बाचकर, अशोक बिडगर ,बापू विटनोर ,संस्थेचे कर्मचारी सचिव ज्ञानदेव विटनोर ,विलास विटनोर ,शिवाजी भगत ,चावा विट नोर , माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण चोपडे, पोपट विटनोर, जयराम विटनोर, रावसाहेब लिंबा हरी विटनोर, अमोल रावसाहेब इत्यादी उपस्थित होते.