
शंभू महादेवाचा यात्रौत्सव दिमाखात साजरा होणार.
—सलग दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर
टाकळीभानसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांंचे आराध्य दैवत असलेल्या शंभु महादेवाचा तीन दिवसाचा यात्रौत्सव सोमवार ९ मे पासुन सुरु होत असल्याने रंग रंगोटी, साफसफाई व इतर कामांची तयारी अंतिम टप्यात आली आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे यात्रौत्सव साजरा झाला नसल्याने यंदा हा यात्रौत्सव मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.
टाकळीभान परीसराचे ग्रामदैवत असलेल्या शंभु महादेवाचा यात्रौत्सव गेली कित्येक वर्षापासून मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. श्रीरामपुर शहरात साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवानंतर येथील यात्रौत्सवाचा नंबर लागतो. सुमारे सहाशे वर्षापुर्वीचे शंभु महादेवाचे भव्य मंदिर हे भक्तांना अदभुत शक्ति देणारे असल्याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. परदेशातील शिवभक्तही या मंदिराला भेट देवुन वेगळीच उर्जा मिळाल्याचे सांगतात. अशा या शंभु महादेवाचा यात्रौत्त्सव अक्षयतृतीये नंतर येणाऱ्या सोमवारी साजरा करण्याची परंपरा रुढ झालेली आहे. यात्रौत्सवासाठी यात्रा कमीटी महीनाभर कामाला लागलेली असते. लोकवर्गणीतुन हा संपुर्ण उत्सव साजरा होत असल्याने यात्रा कमीटी घरोघर फिरुन यथाशक्ती लोकवर्गणी गोळा करुन यात्रौत्सव दिमाखात पार पाडत आसते.
कोरोनामुळे दोन वर्षे यात्रौत्सव साजरा न झाल्याने यंदा ९ मे पासुन सुरु होणारा यात्रौत्सव गर्दीचा उच्चांक करणारा ठरणार असल्याने यात्रा कमेटीनेही कसुन तयारी सुरु केली आहे. गेल्या दोन महीन्यापासून सुरु असलेली मंदीराची रंगरंगोटी पुर्ण झालेली आहे. परीसर स्वच्छ झालेला आहे. मनोरंजनाचे कार्यक्रमही नक्की झालेले आहेत. व्यापारी वर्गाकडुन सातत्याने तीन दिवसाचा यात्रौत्सव सुरु करण्याच्या मागणीनुसार यंदा प्रथमच तीन दिवसांचा यात्रौत्सव होणार असल्याने परीसरात अधिक समाधानचे वातावरण पसरले आहे.
यात्रा कमेटीच्या नियोजनानुसार कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात आली असुन ९ मे सोमवार रोजी सकाळी ६ वाजता गंगाजल मिरवणुक,त्रिमुर्ति ड्रोनद्वारे गगाजलाने जलानेभिषक व पुष्पावृष्टी होणार आहे लघु रूद्राभिषेक, सकाळी ८.३० वाजता आरती, दुपारी १२ वाजता भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता शोभेच्या दारुची आतीषबाजी, ७.३० वाजता छबिना मिरवणुक, रात्री ८.३० वाजता सविताराणी पुणेकर यांचे लोकनाट्य. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम, दुपारी ४ वाजता नामवंत मल्लांचा कुस्त्यांचा जंगी हगामा, रात्री ८.३० वाजता टी.व्ही स्टार पुनम कुडाळकर यांचा ” तुमच्या साठी काही पण ” हा आर्केस्ट्राचा कार्यक्रम. बुधवार दि. ११ रोजी सकाळी १० वाजता टाकळीभान व कारेगाव येथील एकतारी भजन, सायकाळी ५ वाजता मिठुमामा थोरात वाघे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम, सायंकाळी ८ वाजता विनोदाचार्य ह.भ.प. शितलताई साबळे यांचा किर्तनाचा कार्यक्रम होवुन यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.