यात्रेनिमित्त अप्रतिम कुस्त्यांच्या फडाने मैदान गाजले… -दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यात्रेस भाविकांची गर्दी…

यात्रेनिमित्त अप्रतिम कुस्त्यांच्या फडाने मैदान गाजले… –
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यात्रेस भाविकांची गर्दी…
अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या सोमवारी टाकळीभान ची महादेव यात्रा भरत असते, यावर्षी तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटी ने सर्व ग्रामस्थांच्या, व भाविक भक्तांच्या देणगी व सहकार्यातून केले. दोन वर्षांनंतर यात्रा भरल्याने यात्रेस भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व महादेव यात्रा कमिटी ने आयोजित विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद यावेळी भाविकांनी घेतला.टाकळीभान यात्रा उत्सवानिमित्त मंगळवारी दुपारी आयोजित केलेल्या जंगी कुस्त्यांचा फड मल्लांच्या कुस्त्यांच्या अप्रतिम फड गाजला. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जंगी कुस्त्यांचा हंगामा चा मनमुराद आनंद रसिकांनी लुटला. त्यास यात्रा कमिटीने भरघोस बक्षिसांच्या प्रोत्साहनाने कुस्ती मल्ल यांच्यातील विजेता होण्यासाठी रस्सीखेच जोरदार झाली. त्यामुळे त्याचप्रमाणे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी यात्रेस होती. कुस्त्यांच्या जंगी हंगामानंतर रात्रीचा तुमच्यासाठी काही पण हा ऑर्केस्ट्रा, याचा रसिक, भाविक भक्तांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी होती तरी यावेळी पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवला, यासाठी डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी स्वतः उपस्थित राहून यात्रोत्सवाचे शांततेत पार पाडण्यासाठी काळजी घेतली त्याबद्दल यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे धन्यवाद मानण्यात आले. कुस्त्याच्या हंगामाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र कोकणे, ज्ञानदेव साळुंके, मंजाबापू थोरात , सरपंच पती अप्पासाहेब रणनवरे,अमोल पटारे ,गजानन कोकणे ,पाराजी पटारे, अनिल पटारे, शिवाजी पटारे, मधुकर गायकवाड, गोरख कोकणे विशाल पटारे , मयूर पटारे,सुनील बोडखे ,बंडोपंत बोडखे ,बंडोपंत कोकणे ,आबासाहेब रणनवरे, राजेंद्र देवळालकर, विठ्ठल बोडखे , उमेश त्रिभुवन ,अशोक गांगुर्डे, राजेंद्र बोडखे, भाऊसाहेब पटारे, काकासाहेब डिके, बापूसाहेब शिंदे, पोपट जाधव, अशोक वेताळ, रामनाथ माळवदे, मोहण रणनवरे , संदीप जावळे , अशोक गांगुर्डे आदींनी सहकार्य केले.यात्रा कमिटीने सर्व देणगीदार व यात्रेस सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले .कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणावर रसिक प्रेक्षक भाविक भक्त यांनी टाकळीभान यात्रेतील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व मोठ्या संख्येने यात्रेसाठी भाविक उपस्थित होते.