नेवासा- घोडेगाव -शनिशिंगणापूर-राहुरी शटल बस सेवा सुरु करण्याची मागणी.* दुप्पट भाडेवाढ,प्रवाश्यांची लूट

*नेवासा- घोडेगाव -शनिशिंगणापूर-राहुरी शटल बस सेवा सुरु करण्याची मागणी.* दुप्पट भाडेवाढ,प्रवाश्यांची लूट
सोनई –दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सर्वसामान्यांना परवडणारी लालपरी बस वाढून ग्रामीण भागात एस.टी. परिवहन महामंडळाने राहुरी -घोडेगाव-शनिशिंगणापूर-राहुरी शटल बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. आता सुरु असलेली बस सेवा शनि शिंगणापूर पर्यंतच असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस सेवा ही शनि शिंगणापूर पर्यंतच असल्याने पुढे घोडेगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला तोड द्यावे लागत आहे.सोनई-घोडेगाव प्रवासी भाडे वाढ मोठ्या प्रमाणात केली आहे. सोनई – राहुरी तीच परिस्थिती आहे, सोनई घोडेगाव या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुक मोठ्या प्रमाणात चालत असुन यामध्ये अक्षहा जनावराप्रमाणे प्रवाशी भरले जातात त्यातुन कायमच अपघात घडत असतात त्यातच यांची दादागिरी ही नित्याचीच बाब बनली आहे यातुन बरेच अपघात होऊन काहींना अपंगत्व आलेले आहे.या मार्गावर साधारणता या ठिकाणी शंभरच्या आसपास अॅपे रिक्षा चालत आहेत या आधी चांदा श्रीरामपुर घोडेगाव राहुरी अशा एस टी च्या फेऱ्या होत होत्या, त्यावेळेस प्रवाशाना अडचणीला सामोरे जावे लागत नव्हते, मात्र एस टी प्रशासनाने ही सेवा बंद केल्याने प्रवाशाना अडचणींचा सामना करावा लागत आहे, एस टी प्रशासनाने याची दखल घेऊन सोनई घोडेगाव ही शटल बस सेवा सुर करावीं, अशी प्रवाशा कडुन मागणी केली जात आहे .त्याच बरोबर महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थी यांची सखया चांदा घोडेगाव व परिसरातील गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे व आता विद्यालय पुर्ण क्षमतेने सुरू झाल्याने विदलयात शिक्षण घेणा-याची घोडेगाव व आसपासचा परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे दरम्यान,शनी भाविक,उन्हाळी सुट्या लागल्याने दिवसेंदिवस नागरिकांची मोठी गर्दी वाढत आहे,या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थीयाची गैरसोय होणार नाही याची दखल एस. टी .प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होताना दिसत आहे. अहमदनगर शेवगाव ,नेवासा ,राहुरी,येथे जाण्यासाठी प्रवाश्यांची संख्या वाढली आहे, एस.टी. सेवा नसल्याने प्रवाशाची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सोनंई -घोडेगाव -राहुरी शटल बस सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी केली जात आहे.