टाकळीभानच्या याञेत जाणीव पुर्वक वाद घालणाऱ्या विघ्नसंतोषीवर कायदेशिर कारवाई करणार–पोलिस निरीक्षक मच्छींद्र खाडे

टाकळीभानच्या याञेत जाणीव पुर्वक वाद घालणाऱ्या विघ्नसंतोषीवर कायदेशिर कारवाई करणार—पोलिस निरीक्षक मच्छींद्र खाडे
टाकळीभान येते सोमवार पासून तीन दिवस सुरू होत असलेल्या शंभो महादेवाची या याञेत कोणी टारगट मुले दारु पिऊन जानुन बुजुन याञेत वाद घालणारे व जुने वाद याञेत उकरुन काढणारे अशा विघ्णसंतोषी लोंकाचा कारवाई करून बंदोबस्त करणार असल्याचे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी सांगितले.
टाकळीभान तेथे पोलिस निरीक्षक खाडे यांनी महादेव मंदिराला भेट देऊन याञेची पूर्वतयारी पहाणी केली. यात्रा कमिटी व नागरिकांना सूचना करण्यात आल्या. यात्रेत कोणी टारगेट मुलांनी दारू पिऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना बरोबर वाद घालणे व जुने वाद उकरून काढणे अशा विघ्नसंतोषी लोकांचा कायदेशिर मार्गाने बंदोबस्त करणार असल्याने याञेत धिंगाना घालणारे व चिथावनी देणारे अशांचा शोध घेवून कारवाई करण्यात येईल. गावातील प्रतीष्ठीत व पुढारी मंडळी यांनी अशा लोकाची मध्यस्ती करण्यासाठी पुढे येवू नये.कायदा सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी कायदेशिर कारवाई करणे भाग पडणार आहे. त्यामुळे मध्यस्ती करणारांचा अपमान होईल असे पोलीस निरीक्षक खाडे यांनी सांगितले आहे. याञेचा मनमुराद घ्या विशेषता टाकळीभानच्या प्रत्येक घरातील महिला मुलींना याञाउत्सवाचा आंनद घेवूद्या निर्विवाद याञा पार पाडावी.असाही सल्ला यावेळी पोलिस निरीक्षक खाडे यांनी दिला. सध्या पोलिस यंञणेवर बंदोबस्तचा ताण असुन उपलब्ध पोलिस बळावर याञा उत्सव पार पाडायचा आहे.यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने पोलिस निरीक्षक खाडे यांचा यांचा सन्मान करण्यात आला.