बालकांना उत्कृष्ट आहार देणे काळाची गरज, त्यामुळे कुपोषण मुक्त होईल देश- डॉ, राधा गामे,
– बालकांना उत्कृष्ट आहार देणे काळाची गरज, त्यामुळे कुपोषण मुक्त होईल देश- डॉ, राधा गामे,
टाकळीभान येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त श्री संत सावता मंदिर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व भारतीय जनता पार्टी महिला जिल्हा सरचिटणीस सौ सुप्रिया ताई धुमाळ यांनी श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील 175 मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत गोळ्या औषधे वाटप, प्राथमिक केंद्र टाकळीभान यांच्या सहाय्याने आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा 175 बालकांनी लाभ घेतला, यामध्ये 78 बालक हे सामान्य आजाराने आजारी होते त्यांना टाकळी भान प्राथमिक केंद्र यांच्या वतीने मोफत गोळ्या औषधे देण्यात आली व 5 बालके ही सर्वसाधारण कुपोषित आढळून आली, त्यांना सर्वांना सौ सुप्रियाताई धुमाळ यांनी स्वखर्चातून गोळ्या औषधे व टॉनिक दिली ,
डॉक्टर राधा गमे यांनी बालका आहारा विषय मार्गदर्शन केले , या कार्यक्रमाच्या आयोजित करण्यासाठी मोलाची मदत युवा नेते भाऊसाहेब पवार व ज्येष्ठ नेते प्रकाशराव धुमाळ व चंद्रकांत थोरात यांनी केली,
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राहाता येथील डॉक्टर राधा योगेश गमे उपस्थित होत्या ,
टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर राम बोरुडे, डॉक्टर सतीश गलांडे ,डॉक्टर अभिजीत ढाकणे ,हे प्रमुख उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी टाकळीभान येथील अंगणवाडी सेविका संगीता जोशी ,अर्चना मावळे ,छायाताई लांडगे ,रेखाताई कणसे ,मंगल जाधव ,मीरा गवांदे मीर जाधव,,कविता कांबळे ,सुरेखा माने ,सुनिता शिरसाठ,अरुणा पाबळे, मंदा गांगुर्डे ,पार्वती थोरे ,आदी महिला उपस्थित होत्या सर्व उपस्थित होते,