टाकळीभान येथे श्री. साईसच्चरित्र पारायण व भागवत कथा सोहळ्याचे आयोजन.

टाकळीभान येथे श्री. साईसच्चरित्र पारायण व भागवत कथा सोहळ्याचे आयोजन.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री. संत साईबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमितील श्री. साईबाबा मंदिरात दिनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल या
दरम्यान श्री. साईसच्चरित्र पारायण व संत भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या
निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवर्य महंत श्री. भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड संस्थान व गुरुवर्य श्री. रामगिरी महाराज मठाधिपती सरालाबेट यांच्या कृपाशिर्वादाने श्री. संत साईबाबा प्रतिष्ठाण व समस्त ग्रामस्थ टाकळीभान व साई निर्माण ग्रुप शिर्डी व साई संदेश प्रतिष्ठान रूई यांचे संयुक्त विद्यमाने व ह.भ.प.राधेशाम महाराज पाडांगळे व ह.भ.प. रविंद्र महाराज गांगुर्डे टाकळीभान यांच्या अधिपत्याखाली व ह.भ.प. दत्तात्रय महाराज बहिरट व ह.भ.प. संदिप महाराज जाधव संस्थापक रामगिरीजी गुरुकुल कारवाडी यांच्या मार्गदर्शनाने श्री साईसच्चरित्र पारायण व संत भागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
संत भागवत कथा प्रवक्ता हरिचरणारविंद्र रविंद्र
महाराज मुठे उक्कलगाव यांचे सुमधूर अमृतमय वाणी
तून संत भागवत कथा होणार आहे.
या निमित्त पहाटे ५ वाजता काकडा भजन, सकाळी ७ वाजता श्रींची आरती व ग्रंथ पारायण, दुपारी आरती व त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी. ४ ते ५ हरिपाठ नंतर आरती व त्यानंतर महाप्रसाद, रात्री ८.३० ते ११ संत भागवत कथा होणार आहे.
शनिवार दि. २३/४/२०१२ रोजी दुपारी ४.०० वाजता भव्य पालखी व ग्रंथ मिरवणुक होणार असून
रविवार दिनांक.२४/४/२०२२ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य ह.भ.प. कृष्णाजी महाराज मते (हनुमान गड) गुजरवाडी यांचे काल्याचे किर्तन होवून
सोहळ्याची सांगता होणार आहे.
या पारायण व संत भागवत कथा सोहळ्यात
भजनी मंडळ टाकळीभान, कारवाडी, पाचेगांव, घोगरगांव, कमालपूर, भोकर, घुमनदेव, पिंपळगांव, खिर्डी, खोकर, कारेगांव, रुख्मिणी माता भजनी मंडळ, श्री गुरुदत्त भजनी मंडळ हे सहभागी होवून संगितसाथ देणार आहेत. तरी या साईसच्चरित्र पारायण व संत भागवत कथा सोहळ्याचा लाभ घ्यावा
असे आवाहन श्री. संत साईबाबा प्रतिष्ठाण, ग्रामस्थ, साईबाबा भक्त मंडळ, किसनगिरीबाबा भक्त मंडळ
यांनी केले आहे.