महाराष्ट्र
आज घुमनदेव ची भैरवनाथ यात्राउत्सव.

आज घुमनदेव ची भैरवनाथ यात्राउत्सव.
घुमनदेव येथील ग्रामदैवत देवस्थान भैरवनाथची यात्रा आज शुक्रवार दि.15 एप्रिल रोजी होणार असून येथील यात्रा उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रे दिनी पहाटे ठीक 5 वा. गंगाजल अभिषेक तसेच सकाळी 7 वा. भैरवनाथ अभिषेक होणार असून दुपारी 3 वाजता भैरवनाथ दर्शन कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 ते 9 छबिना कार्यक्रम, मिरवणूक तसेच रात्री 9 ते 12 औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम होणार आहे, तसेच यात्रा उत्सव च्या दुसऱ्या दिवशी दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा आयोजित करण्यात आला आहे. तरी भैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन भैरवनाथ यात्रा उत्सव समिती ,घुमनदेव यांच्या वतीने करण्यात आले आहे.