जिद्द व अभ्यास करून आॅफीसर बनावे—रोशनी डांगे.

जिद्द व अभ्यास करून आॅफीसर बनावे—रोशनी डांगे.
गोरगरीबांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा पोहचविण्याचे अनमोल कार्य डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले असून रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज उच्च पदावर विराजमान असल्याने विद्यार्थ्यांनी जिद्द व
अभ्यास करून आॅफिसर बनावे असे आवाहन श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालयाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोशनी डांगे यांनी केले.
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी डांगे बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा प्रवरा वीज संस्थेचे
माजी संचालक व माजी सरपंच मंजाबापू थोरात होते.
प्रारंभी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष राहूल पटारे, बापूसाहेब पटारे,प्राचार्य बी. टी इंगळे, रोशनी डांगे, मंजाबापू थोरात आदी मान्यवरांच्या हस्ते डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतीमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांचा व विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना राहूल पटारे म्हणाले, विद्यालयाची वाटचाल चांगली सुरू असून विद्यालय
प्रगतीपथावर आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाखांमध्ये
टाकळीभान शाखा एक नंबर करण्यासाठी प्रयत्न सुरूअसून लवकरच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. शाळा खोल्यांसाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन पटारे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना मंजाबापू थोरात म्हणाले, विद्यालयास प्राचार्य चांगले लाभल्याने विद्यालयाने कात टाकली असून विद्यालयात आयोजित करण्यात येणार्या विविध कार्यक्रमाबाबत सर्वांना विश्वासात घ्यावे व विद्यालयास प्रगती पथावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रीत येवून सहकार्य करावे असे आवाहन थोरात यांनी केले.
यावेळी विद्यार्थी प्रज्वल नवले, सुप्रिया कदम व तन्वी खंडीझोड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गोरख बनकर, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे,ग्रामपंचायत सदस्या अर्चना पवार, भाजपाच्या महिला आघाडी सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, अनिता तडके, पाराजी पटारे, भारत भवर सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, गोरक्षनाथ दाभाडे, सुनिल त्रिभुवन, मोहन रणनवरे, प्रा. बाळासाहेब लेलकर, खंडेराव गवांदे, लक्ष्मण कदम, नानासाहेब लेलकर,, भाऊसाहेब कोकणे, शिवाजीराव धुमाळ,आप्पासाहेब रणनवरे, आबासाहेब रणनवरे, विशाल पटारे, बापूसाहेब शिंदे, शिवाजी पवार, मधुकर गायकवाड, बाबासाहेब थोरात, मगर, साळवे,सर्व सेवकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी टी इंगळे यांनी केले, अहवाल वाचन सुनिल बनकर यांनी केले, सुत्रसचालन प्रियंका चाबुकस्वार यांनी केले तर आभार ए ए पाचपिंड यांनी मानले,