टाकळीभान येथे अद्यावत बस स्थानकाची मागणी, प्रवासी ताटकळतात उन्हात.

टाकळीभान येथे अद्यावत बस स्थानकाची मागणी, प्रवासी ताटकळतात उन्हात.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील लोकसंख्येने मोठ्या आसलेल्या व राज्यमार्गालगतच्या टाकळीभान येथील जुने छोटेसे बसथांबा शेड राज्यमार्गाच्या रुंदिकरणात जमिनदोस्त केल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उन्हात ताटकळत तासंतास उभे रहावे लागत आसल्याने अद्यावत त्याच जागेवर बस स्थानक बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन व प्रवाशांकडुन होवु लागली आहे.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील टाकळीभान हे मोठ्या लोकसंख्येचे गाव. बाजारपेठ मोठी आसल्याने परीसरातील सुमारे १५ खेड्यांची ही महत्वाची बाजारपेठ. बाजारपेठेमुळे परीसरातील खेड्यांची येथे मोठी वर्दळ असते. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी येथील बस थांबा हा महत्वाचा पर्याय प्रवाशांपुढे आहे. त्यामुळे बस स्थानक परीसरही नेहमीच गजबजलेला असतो. स्थानिक विद्यार्थ्यांसोबतच परीसरातील विद्यार्थ्यांचीही नेहमी या बसथांब्यावर मोठी वर्दळ असते.
गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपुर्वी प्रवाशांना निवारा मिळावा म्हणुन राज्यमार्गालगत छोट्या स्वरुपात पिकअप शेड एस टी. महामंडळाने या परीसरात बांधले होते. त्याकाळात प्रवासी संख्या, विद्यार्थी संख्या कमी आसल्याने त्या छोट्या स्वरुपाच्या पिकअप शेडचा प्रवाशांना व विद्यार्थीनींना आधार वाटत होता. माञ गेल्या तीन चार महीण्यांपासुन बाभळेश्वर ते नेवासा फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचे काम सुरु आसल्याने हे जुने छोटेसे माञ प्रवाशांना आधार देणारे पिकअप शेड पाडले गेल्याने महीला प्रवाशांचा व विद्यार्थिनींचा मोठा आधार हरपला आहे. ऐन उन्हात गाडीची वाट पहात तास तास रोडवरच उभे रहावे लागत आहे. त्यातच रस्त्यावर गाडीची वाट पहात आसलेल्या विद्यार्थिनींना टवाळखोरांचा ञास सहान करावा लागत आहे. त्यामुळे महीला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोठी कुचंबना होत आहे तर कधी कधी वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.
गावाची वाढती लोकसंख्या तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनींची व त्यासोबतच प्रवाशांची वाढती संख्या पहात येथे आहे अद्यावत बसस्थानक होणे गरजेचे आसल्याने त्याच जागेवर अद्यावत बसस्थानक व्हावे अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडुन केली जात आहे.