
हरिशरणगिरीजी महाराज यांना दिली अनोखी वस्तु भेट.
टाकळीभान (प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील तरुण व पत्रकार बापुसाहेब नवले यांनी बाजाठाण येथील रामदरबार आश्रमचे महंत हरिशरणगिरीजी महाराज यांना दिली अनोखी वस्तु भेट. गंगापुर तालुक्यातील बाजाठाण येथील रामदरबार आश्रमात सुरू असलेल्या रामलल्ला सप्ताहात टाकळीभान येथील बापुसाहेब नवले यांनी राम मंदीर देवस्थानचे मंहंत ह.भ.प. हरिशरणगिरीजी महाराज यांना प्रभु रामचंद्र यांची जन्मभुमी असलेल्या आयोध्या नगरी येथुन आणलेल्या सिसम लाकडाचे व पितळी नक्षिकाम केलेल्या पादुका हरिनामाच्या जय घोषाने व टाळ मृदुंगाच्या आवाजात वाजत गाजत अर्पण केल्या. अर्पण करताना पत्रकार बापुसाहेब नवले, राजेद्र नवले, गोकुळ भालेराव, दिलीप पवार, लहानुभाऊ पवार, भानुदास नवले व पादुका स्वीकारताना महंत हरिशरणगिरीजी महाराज व भक्त गण मंडळ यावेळी उपस्थित होते
Rate this post