डीजे मुक्त जयंती उत्सव व यात्रौत्सव साजरा करण्याचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचे आवाहन….

..
डीजे मुक्त जयंती उत्सव व यात्रौत्सव साजरा करण्याचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचे आवाहन….
मानननिय सर्वोच्च न्यायालय च्या आदेशानुसार सार्वजनिक जयंती उत्सव मध्ये डीजे ला वाजवण्यास बंदी असल्या कारणाने श्री गोंदा पंचायत समिती कार्यालयात आज सकाळी श्रीराम नवमी, महात्मा ज्योतिराव फुले जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती व गावातील यात्रा उत्सव निमित्त कर्जतचे विभागीय पोलीस अधिकारी माननीय . अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री गोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले उपनगराध्यक्ष संग्राम घोडके तर साजरे करणारे मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी श्री. अण्णासाहेब जाधव साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक उत्सव व जयंती उत्सव मध्ये डीजे वाजवण्यास बंदी असणार आहे.तरी सर्वांनी पारंपरिक वाद्य वाजवून जयंती उत्सव व यात्रा उत्सव साजरे करावेत. जर कोणी डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांनी सण-उत्सव जयंती उत्सव, यात्रा उत्सव शांततेत साजरे करावेत अशा सूचना संबंधित गावचे पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष यांना देण्यात आल्या. पुढे बोलताना जाधव साहेब म्हणाले की नाचण्याचे वेड लागण्यापेक्षा वाचनाचे वेड लागले पाहिजे तरच भावी पिढी सक्षम होईल. डीजे लावण्यापेक्षा रक्तदान शिबिर अन्नदान सार्वजनिक पानपोई असे उपक्रम या जयंती उत्सवानिमित्त राबविण्यात यावे. असे आवाहन पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले
या बैठकीत मार्गदर्शन करताना तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले की हे महापुरुष सर्व जाती धर्माचे आहेत त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केले आहे त्यामुळे हे महापुरुष कुठल्या एका जातीचे नसून सर्व जातीची धर्माचे आहेत त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार सर्वसामान्यांना पोहोचले पाहिजे त्या मुळे समाज प्रगती पथावर जाईल
यावेळी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके म्हणाले की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांततेत शहारातुन दुपारी मिरवणूक काढण्यात येणार असुन डिजे लावणार नाही तसेच सायंकाळी च्या दरम्यान सिद्धार्थ नगर मध्ये त्याच ठिकाणी ढोल ताशा वाजविणार असून कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू देणार नाही यावेळी मढेवडगाव चे प्राध्यापक योगेश मांडे म्हणाले की आम्ही यावेळेस शिवजयंती व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल ला करण्यात येणार असून दोन्ही जयंती एकाच दिवशी साजरी शांततेत करणार आहे
तसेच पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांनी चोख बंदोबस्त ठेवला जाईल कारण या महिन्यात मोठे मोठे यात्रा उत्सव असतात आणि महापुरुषांच्या जयंती ही असतात त्यामुळे नागरिकांनी उत्सव शांततेत पार पाडावे व पोलिसांना सहकार्य करावे असे मत व्यक्त केले यावेळी तालुक्यातुन सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे अध्यक्ष पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते