डिग्रस गावामध्ये जयबा महाराज यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा नामवंत मल्लांनी कुस्त्यांच्या फडामध्ये हजेरी

डिग्रस गावामध्ये जयबा महाराज यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा नामवंत मल्लांनी कुस्त्यांच्या फडामध्ये हजेरी
राहुरी तालुक्यातील डिग्रस गावामध्ये जयबा महाराज यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. नामवंत मल्लांनी कुस्त्यांच्या फडामध्ये हजेरी देत वेगवेगळे डाव दाखवित ग्रामस्थांचे पारणे फेडले. दोन वर्षाच्या कालखंडानंतर झालेला यात्रोत्सव ग्रामस्थांच्या आनंदाला पर्वणी ठरला.
डिग्रस गावाचे श्रद्धास्थान असलेल्या जायबा महाराज यांच्या यात्रोत्सवामध्ये कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता झाली. कुस्त्याच्या हगाम्यामध्ये ग्रामस्थांकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. तमाशा, छबीना व सांस्कृतीक कार्यक्रमांनी यात्रोत्सवाची शोभा वाढविली होती. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुस्त्याच्या हगाम्यामध्ये सुत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले.
कुलगुरू डॉ. पाटील यांनी कावड्यांचे स्वागत केले. तर शेवटच्या सलामी कुस्तीमध्ये पै. राम वने (ब्राम्हणी) व पै. दत्ता जगदाळे (वासुंदे) यांच्या शेवटच्या कुस्तीमध्ये वन यांनी बाजी मारली. डिग्रस ग्रास्थिांनी उपस्थित झालेल्या मल्लांना फेटे बांधज जंगी मिरवणूक काढली. यात्रोत्सव अध्यक्ष गोरक्षनाथ दुशिंग, उपाध्यक्ष कुंडलिक गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिगारदे, ज्ञानेश्वर भिंगारदे, योगेश भिंगारदे, संदिप ओहोळ, मधुकर पवार, बाभळेश्वर दूध संघाचे संचालक रावसाहेब पवार, संजय पवार, केशव बेल्हेकर, सुभाष बेल्हेकर, बाळकृष्ण गावडे, बाळासाहेब वाघमोडे, शिवाजी झिने, परसराम बेल्हेकर, ठेकेदार दळवी यांसह ग्रामस्थांनी यात्रोत्सव यशस्वी करण्यााठी अधिक परिश्रम घेतले.