राजकिय
टाकळीभान जि.प. गटात मोठा फेरबदल, मातब्बर गावांचा सामावेश झाल्याने ईच्छुकांची मांदियाळी होणार.

टाकळीभान जि.प. गटात मोठा फेरबदल, मातब्बर गावांचा सामावेश झाल्याने ईच्छुकांची मांदियाळी होणार.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील नेहमीच प्रतिष्ठेच्या राहीलेल्या टाकळीभान जिल्हा परीषद गटाचा नव्या पुनर्रचनेनुसार मोठा फेरबदल झाला आहे. या गटात मातब्बर गावांची संख्या वाढल्यामुळे ईच्छुकांची मोठी मांदियाळी या गटात व पंचायत समिती गणात होणार आसल्याने या गटातील लढतीही मातब्बर होणार आसल्याचे संकेत आज तरी मिळत आहेत.
अहमदनगर जिल्हा परीषदेच्या गटांची पुनर्रचना झाल्याने जिल्हा परीषदेच्या गटांची वा पंचायत समितीच्या गणांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातही एक जिल्हा परीषदेचा गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. जि.प.गट.आणि पं.स. गण यांची संख्या वाढल्याने पुर्वीच्या गटाची व गणांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे.
तालुक्याच्या पुर्वभागातील राजकारणातील नेहमीच प्रतिष्ठेच्या राहीलेल्या टाकळीभान जि.प. गटाची व यातील दोन्ही पंचायत समिती गणांची पुर्णपणे तोडफोड होवुन राजकिय प्रतिष्ठेची मातब्बर १० गावं या गटात सामाविष्ठ झाली आहेत. आज मितीला ३३५६२ मतदार या गटात मतदानास पाञ आहेत. यात वाढ अपेक्षित आहे. या जि. प. गटात टाकळीभान आणि भोकर आसे दोन पंचायत समितीचे गण नव्या रचनेनुसार तयार करण्यात आले आहेत. टाकळीभान पंचायत समिती गणात टाकळीभान ( ७९२० ), माळवाडगाव ( ३२३१ ), खानापुर ( १६०३ ), भामाठाण ( १६८८ ), मुठेवाडगाव ( १९४५ ), घुमनदेव ( ९४८ ) व कमालपुर ( ८३८ ) अशी ७ गावं सामाविष्ट करण्यात आली आहेत. एकुण १८१७३ मतदार या गणात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर पंचायत समितीच्या भोकर गणात भोकर ( ४९५४ ), वडाळामहादेव ( ४५५८ ) तर शिरसगाव ( ५८७७ ) असे एकुण १५३८९ मतदार या गणातमतदानाचा हक्क बजावणारआहेत. निवडणुक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसल्याने निवडणुकिपुर्वी झालेल्या मतदार यादीच्या सर्वेक्षणाणुसार मतदार संख्येत आधिक वाढ होणेअपेक्षित आहे.
पुर्वीच्या टाकळीभान जिल्हा परीषद गटातील सर्वच गावं या पुनर्रचनेत बदलले आहेत.टाकळीभान, माळवाडगाव, मुठेवाडगाव, कमालपुर, भोकर, वडाळामहादेव व शिरसगाव ही जवळपास सर्वच राजकियदृष्ट्या मातब्बर आसलेली गावं या गटात आसल्याने राजकिय ईच्छाशक्ती बाळगुन आसलेल्या ईच्छुकांची संख्या या गटात मोठी आहे. त्यामुळे निवडणुकित घमासान होणार आसल्याचे बोलले जात आहे. या गटात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या नेत्यांचा पगडा आसल्याने कोणत्याही गटाच्या उमेद्वाराला निवडणुक सोपी नसल्याचे चिञ आज तरी दिसत आहे अद्याप निवडणुक जाहीर झालेलीसनसली तरी काही ईच्छुकांनी गटात व गणात संपर्क वाढवलेला दिसत आहे. कधी न रामराम घालणारे रस्त्याने जाता येता हात वर करु लागल्याने आगामी निवडणुकिसाठी ईच्छुक आसल्याचा मतदार अंदाज बांधु लागले आहेत. निवडणुक लांबणीवर पडल्याने ईच्छुकांना मतदारांच्या संपर्कासाठी आवधी मिळलेला आसला तरी निवडणुक जाहीर झाल्यावर पक्षा पक्षाची व गटा गटाची कशी सोयरीक जुळते यावर ईच्छुकांचे भवितव्य आवलंबुन आसणार आसले तरी राजकिय मातब्बर गावांच्या या गटात निवडणुकित मोठी चुरस निर्माण होणार हे माञ नक्की.
Rate this post