आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
जिल्हा परिषद शाळेमध्ये गोकुळाष्टमी साजरी

जिल्हा परिषद शाळेमध्ये गोकुळाष्टमी साजरी
टाकळीभान येथील जिल्हा परिषदे शाळेमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त बाल गोपालांसाठी दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण राधेच्या व श्रीकृष्णाच्या सवंगड्यांच्या वेशभूषा केल्या होत्या. संगीताच्या तालावर नाचत या दहीहंडी कार्यक्रमाचा बालगोपाल यांनी आनंद घेतला. या कार्यक्रम प्रसंगी मुकुंद हापसे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, पालक सचिन माने, मुख्याध्यापक अनिल कडू,शिक्षक वृंद कुमार कानडे शिवाजी पवार आदींसह शिक्षक शिक्षिका, पालक उपस्थित होते.