राजकिय
आडगाव येथे अतिशय चुरशीने पार पडलेली सेवा संस्थेची निवडणुक

आडगाव येथे अतिशय चुरशीने पार पडलेली सेवा संस्थेची निवडणुक
पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील अतिशय चुरशीने पार पडलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा विकास मंडळाने सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकून एक हाती सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार मोनिकाताई राजळे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे गट आमनेसामने निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते.सदर निवडणुकीमध्ये आमदार मोनिकाताई राजळे समर्थक तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे माजी सरपंच जिजाबा तात्याबा लोंढे यांच्या अधिपत्याखालील जनसेवा विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार केला