महाराष्ट्र
टाकळीभान येथे उद्या महानभव आश्रमात सन्यास दिक्षा सोहळ्याचे आयोजन.

टाकळीभान येथे उद्या महानभव आश्रमात सन्यास दिक्षा सोहळ्याचे आयोजन.




श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील महानभव आश्रमात गुरूवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ९.३० ते १२ या दरम्यान अपुर्व भेटकाळ व अनुसरण संन्यास दिक्षा विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या
सोहळ्यास ग्रामस्थ, भाविक भक्तांनी उपस्थित रहावे
असे आवाहन आश्रमाचे मठाधिपती मुरलीधर दर्यापूरकर महाराज यांनी केले आहे.
यावेळी धर्मकुमारी कविता जाधव व धर्मकुमार विजय लहु अभंग (माळवाडगांव) हे आपल्या स्वेच्छेने श्री चक्रधर प्रभुची शरणागती स्वीकारून अनुसरन सन्यास दिक्षा घेणार आहेत. या निमित्त सकाळी ६ वा. महास्थानास मंगलस्नान, ७ वा. श्री गीतापाठ पारायण, ८.३० वा. ध्वजारोहन व दीप प्रज्वलन व सभामंडप उद्घाटन, ९ वा.- स्वागत समारंभ वअध्यक्ष निवड, सकाळी ९.३० ते १२ धर्मसभा व अनुसरण विधी, दुपारी १२ ते १२.३० मंगल आरती, उपहार
महाप्रसाद, संत महंताचे पूजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असून कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मुरलीधर बाबा दर्यापुरकर, व्यवस्थापक तपस्विनी सुनंदाबाई शेवलीकर व समस्त शेवलीकर व दर्यापुरकर परिवार यांनी केले आहे.