
टाकळीभान घोगरगाव रस्त्याच अत्यंत दयनीय अवस्था
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान घोगरगाव रस्त्याच अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, लवकरच रस्त्याचे काम सुरु करावे असे ,मागणी घोगरगाव येथील शेतकरी सेवानिवृत्त कालवा निरीक्षकम आबासाहेब पटारे, व ग्रामस्थ यांनी केले आहे प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम झालेले नसून त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ,कोकणी वस्ती ते चौफुली पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे, वाहनधारकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, अनेक अपघात झाले आहेत, आत्तापर्यंत दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तरी हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा असून ,दोन्ही तालुके आमदारांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम करावे, अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा, इशाराही देण्यात आला आहे,
Rate this post