संस्थेला टोळधाडीपासून वाचविण्यासाठी गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या स्वच्छ व पारदर्शक कारभार करु – जालींदर कुऱ्हे

संस्थेला टोळधाडीपासून वाचविण्यासाठी गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या स्वच्छ व पारदर्शक कारभार करु – जालींदर कुऱ्हे
बेलापूर(प्रतिनिधी)ःसत्ताधा-यांंनी सोसायटीच्या जुन्या सुंदर व मजबुत अशा इमारतीची दुर्दशा करुन दुरुस्तीच्या नावाखाली पक्के मजबुत बांधकाम तोडण्याचे महापाप केले असुन त्यामुळे ए डी सी सी बँक व पतंजली केंद्राचे नुकसान झाल्याचा आरोप गावकरी मंडळाचे ज्येष्ठ नेते जालिंदर कु-हे यांनी केला आहे . गांवकरी मंडळाचे जेष्ठ नेते जालींदर कुऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की अशी चुकीची कामे करुन संस्थेचे नुकसान करणारांना आता घरीच बसवायची वेळ आली आहे . बेलापूर सोसायटीची दुमजली इमारत ही संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सन १९७१ मध्ये उभी राहीलेली आहे .ज्यांना बोगस कामे करुन पैसे उकळायची सवय आहे अशा लोकांनी जनरल मिटींगची परवानगी न घेता सभासदांना पूर्व कल्पना न देता स्ट्राँगरुमच्या नावाखाली इमारतीला मागच्या बाजूला भगदाड पाडले.भिंत एवढी मजबूत होती की ती तोडायला व्हायब्रेटरचा वापर करावा लागला .सदरचे भगदाड पाडून शेजारी सावञ ईमारत बांधण्यात आली.त्यावर लाखो रुपये खर्च केले गेले. स्ट्राँगरुमची सावञ इमारत झाली आणि मूळच्या चांगल्या भक्कम इमारतीत गळती सुरु झाली.या गळतीमुळे बँकेच्या साहित्याचे नुकसान झाले.तसेच तळमजल्यावरील पतंजली औषधालयाचेही लाखो रुपयांच्या औषधांचे नुकसान झाले.सदरचे लिकेज काढण्यासाठी टेंडर काढण्यात आले.वास्तविक दोन इमारतीतील फट बुजविणे एवढेच काम करणे आवश्यक होते.त्याऐवजी संपूर्ण छतच खोलले आणि ओबडधोबड डागडुजी केली गेली.यात संशयास्पद व्यवहार झाल्याची शंका आहे.स्ट्राँगरुम ही संस्थेच्या मुळ इमारतीसाठी राँगरुम ठरल्याची टिका श्री.कु-हे यांनी केली आहे.अशी चुकीची कामे करुन त्यात गैरव्यवहार करणारांच्या हाती पुन्हा सत्ता द्यायची कां असा सवालही त्यांनी केला आहे.ज्यांनी अधिकार नसताना चुकीच्या पध्दतीने ग्रामपंचायत हाकली अधिकार नसताना सोसायटीत चुकीची कामे केली गुपचुप ठराव बदलले हे चुकीचे चालले हे माहीत असुनही काही सुज्ञ जण गप्प बसले मग आपला सुज्ञपणा हरवलेल्या स्वयंघोषीत नेत्याना आपण पुन्हा निवडून देवुन आपल्या कामधेनुचे नुकसान करणार का ?असा सवाल कुऱ्हे यांनी केला असुन आपल्या संस्थेला टोळधाडीपासून वाचविण्यासाठी आता गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या ग्रामपंचायत नतर सेवा संस्थेतही स्वच्छ व पारदर्शी कारभार करु अशी ग्वाही कुऱ्हे यांनी दिली आहे .