आमचा कारभार चोख आहे भ्रष्टाचाराचे पुरावे दाखवा -सुधीर नवले

आमचा कारभार चोख आहे भ्रष्टाचाराचे पुरावे दाखवा -सुधीर नवले
बेलापुर (प्रतिनिधी )-सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपाच्या घटीबाबत व नविन केबिन बांधकामाबाबत विरोधकांच्या तक्रारीवरुन सहाय्यक निबंधकांनी काढलेली नोटीस चौकशीअंती वि उ लकवाल सहाय्यक निबंधक यांनीच परत घेतली असुन आमचे कामकाज चोख असल्याचा दावा शेतकरी जनता विकास अघाडीचे नेते सुधीर नवले यांनी केला आहे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात शेतकरी जनता विकास अघाडीचा नेते सुधीर नवले पुढे म्हणाले की जि प सदस्य शरद नवले यांनी सन २०१८ साली बेलापुर सेवा सोसायटीच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या .पाच हजार लीटर पेट्रोल डिझेल घट दाखविण्यात आली तसेच पेट्रोल पंपाचे केबिन बांधकाम अंदाजपत्रकात साडेसात लाख रुपये असताना १५ लाख रुपये बेकायदेशीर खर्च केला असल्याची खोटी तक्रार केली त्या तक्रारीची दखल घेवुन सहाय्यक निबंधकानी नोटीस काढली होती त्या तक्रारी नुसार सहाय्यक निबंधक लकवाल यांनी पेट्रोलीयम कंपनीशी चौकशी करुन घटीबाबत पडताळणी केली असता बेलापुर सेवा संस्थेने कंपनीच्या नियमापेक्षाकमी घट दाखवीली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सहाय्यक निबंधक लकवाल यांनी संदर्भ क्रमांक ३ नुसार काढलेली कारणे दाखवा नोटीस परत घेण्यात येत असल्याचा आदेश काढला विरोधक खोट्या नाट्या अफवा पसरवत आहेत परंतु गेल्या दहा वर्षात संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा झालेला आहे ७०लाख रुपये फंडात जमा आहे स्वभांडवल ५० लाख रुपये जमा आहेत आम्ही आजपर्यंत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा .नाईक जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार चोख सांभाळला आहे त्यामुळे विरोधकांचे पित्त खवळले असल्याचा आरोपही नवले यांनी केला असुन सभासद शेतकरी जनता विकास अघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वासही नवले यांनी व्यक्त केला आहे