अर्थिक तडजोडी मुळे शिरेगाव चोरी प्रकणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात

अर्थिक तडजोडी मुळे शिरेगाव चोरी प्रकणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई जवळील शिरेगाव येथे १९डिसेबर रोजी झालेल्या घरफोडीत साडे चार तोळे सोने चोरीला गेले होतें या धाडशी चोरी प्रकरणी सोन,ई पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असले तरी दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते सोन्याचे काही दागिने परिसरातील प्रसिध्द सराफाने व काही सोने आरोपीने एका मल्टीस्टेट सस्थेत ठेवलेल्याचे समजते त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत याबाबत पोलीस ठाण्यातुन समजलेली माहिती अशी की शिरेगाव येथील कर्णासाहेब देवराव जाधव (वय३७)हे घराला कुलुप लाऊन कुटुंबासह गावातील होन वस्तीवर जागरण गोंधळ कार्यक्रमाला गेले होतें रात्री सव्वा आठ वाजता घरी येताच त्यांना घरांचा एक दरवाजा उघडा दिसला घरातील कपाटाची उचकापाचक झालेली दिसल्यानंतर खात्री केली असता मणीमगळसुत्र सोन्याची माळ कानातील झुबे अंगठी नथ असे साडे चार तोळयाचे दागिणे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सोन,ई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदर घटनेला दहा बारा दिवस होऊन ही तपास लागत नव्हता सोन,ई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यातील काही सोने सोन,ई घोडेगाव रस्त्यावरील एका नामांकित सराफास दिले व कांहींसोने मित्राचा नावांवर खरवडी येधील एका पतसंस्थातेत तारण ठेऊन पैसे काढल्याचे खात्रीलायक रित्या समजणे आता सोन, ई पोलीस सराफ व मल्टीस्टेट सस्थेवर काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणी पोलीसांनी मोठी गुंतवता पाळल्याने या विषयी शंका उपस्थित होत आहे तपासाचा भाग म्हणून गुप्तता होती असे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी सांगितले अल्पवयीन मुलांनी मौज मजा करत एक मोटारसायकल घेतल्याने पोलीसानी संशयावरुन ताब्यात घेतले आणखी तपास सुरु आहे. कोट. सराफाकडुन पोलीसांनी केली मोठी तोडपाणी घोडेगाव रोड वरील सराफाकडुन सोन,ई पोलीसांनी अर्थिक तडजोड झाल्याने सदर सराफावर कारवाई होणार नाही कारण या सराफावर कारवाई होणे अपेक्षीत असताना पोलीसांनी तडजोडीने प्रकरण बासनात गुंडाळून ठेवले आहे या आधी सुध्दा सदर सराफ व्यावसायिकाने असे प्रकार केले आहे का याचा उलगडा झाला असता पोलीसांनी अर्थिक तडजोडी मुळे हे प्रकरण थांबणार आहे अशी चर्चा परिसरात सुरू आहे
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई