रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत तुमचा सेवकच राहील. आमदार……..

- रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत तुमचा सेवकच राहील. आमदार सुहास कांदे
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा शिवसेना ज्येष्ठ नेते बापू साहेब कवडे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
जातेगावमधील आई लॉन्स ला जातेगाव गट कार्यकर्ते मेळावा घेण्यात आला.यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन करतांना आमदार कांदे यांनी नांदगाव मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे.आपण दिलेल्या मतदान रुपी आशीर्वाद मुळे मी आज आपल्या समस्या विधिमंडळात मांडू शकलो.असाच आशीर्वाद आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत आपण शिवसेनेला देऊन पक्ष जो उमेदवार देईल त्यांना भरगोस मातांनी निवडून द्यावे असे आव्हान केले.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते बापू साहेब कवडे,किरण देवरे,अमोल नावंदर,गुलाब भाबड,अनिल रिंढे,तेज कवडे, अर्जुन पाटील,दत्तात्रय निकम,एन के राठोड,संजय बोरसे, मच्छिंद्र पठाडे,वाल्मिक गायकवाड,पंचायत समिती उपसभापती मधुबाला खिरडकर,आनंदा सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी,विजय इप्पर, यांच्या सह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.या कार्यक्रम चे प्रास्ताविक गुलाब चव्हाण,यांनी केले सुत्रसंचांलन चंद्रकांत जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन एन के राठोड यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी यावेळी हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला तर वसंतनगर तांडा मधून ही मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना पक्ष प्रवेश केल्याने आगामी निवडणुकीत पक्षाची ताकत निश्चित वाढेल असा अंदाज आहे. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी त्यांना शाल व श्रीफळ देत शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले.