मोरवाडी टाकळीमिया येथील मंजूर जलजीवन योजनेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

मोरवाडी टाकळीमिया येथील मंजूर जलजीवन योजनेची अधिकाऱ्यांकडून पाहणी
मोरवाडी ( टाकळीमिया ) येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १ कोटी ९५ लाख २५ हजार मंजूर योजनेची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष येरेकर यांनी पाहणी केली .
टाकळीमिया गावासाठी यापूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण करण्यात आलेली ९ कोटीची योजना फेल ठरल्यानंतर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नाने व सुरेश आप्पा निमसे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने मोरवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १ कोटी ९५ लाख २५ हजार रुपयाची पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे, सदर योजनेतील पाण्याच्या टाकीचे ८० टक्के पूर्ण झाले असून या कामाची पाहणी कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे , उपकार्यकारी अभियंता परदेशी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्य सुनिताताई सुरेश निमसे , टाकळीमियाचे उपसरपंच किशोर मोरे , ग्रामपंचायत सदस्य गिरीश निमसे, रामभाऊ जाधव, भागवत जाधव, दत्तात्रय जुंदरे, शिवाजी कोतकर, ठेकेदार सुरेश परदेशी, सोन्याबापु निमसे, मुख्यध्यापक सौ, सारिका रणदिवे अंगणवाडी सेविका श्रीमती विधाटे मॅडम, व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणी योजनेच्या कामाचे पाहणी करण्यात आली. सदर पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर करपे वस्ती, शिंदे मळा, देशमुख वस्ती, ढोबळे शिंदे वस्ती, कुरणपट्टी रोड, मगर वस्ती इत्यादी भागातील ३०० ते ४०० कुटुंबांना स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा करण्याचे उद्देश असून पाणी ही जीवनाची गरज आहे . म्हणूनच पाणी योजनेसाठी यांनी सातत्याने पाठपुरावा करून सदर योजना मंजूर केली लवकरच ही योजना पूर्णत्वास येऊन पाणीपुरवठ्याची सोय होईल अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी मोरवाडी व टाकळीमिया येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.